Ajit Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : एसटी कामगारांच्या थकीत पगारावरून अजित पवारांचे शिंदे सरकारला चिमटे; म्हणाले, 'आपलं ठेवायचं झाकून...'

एका कार्यक्रमात अजित पवार यांनी एसटी कामगारांच्या थकीत पगारावरावरून शिंदे सरकारला चिमटे काढले आहेत

रोहिदास गाडगे

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार आज, शुक्रवारी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी एसटी कामगारांच्या थकीत पगारावरावरून शिंदे सरकारला चिमटे काढले आहेत. 'आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पहायचं वाकून, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे सरकारला टोला लगावला. (Latest Marathi News)

पुण्यातील रांजणगाव महागणपती गावच्या ग्रामसचिवालय लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) हल्लाबोल केला.

'चाळीस खोके एकदम ओके आज झोंबतय ना...काहीतरी चुकलंय म्हणून तर झोंबतय, अशा शब्दात अजित पवार यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

अजित पवार पुढे म्हणाले, 'कोरोना काळात आर्थिक तिजोरी माझ्याकडे होत्या. एक रुपया कमी पडू दिला नाही. एसटी कामगारांचा पगार होत नाही जबाबदार कोण? आमच्या काळात पैसे नसताना पगार थकवले नाही. आता एसटी कामगारांचे पगार थकलेत आता काय?'

'आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पहायचं वाकून, असं म्हणत अजित पवार यांनी एसटी कामगरारांच्या थकीत पगारावरून राज्य सरकारला चिमटे काढले'.

'पुण्यात कोयता गँग आली आहे. कोणी उठतय गँग तयार करतंय. कायदा व्यवस्था बिघडतेय, असं म्हणत गृहमंत्र्यांच्या कामावर अजित पवारांनी टीका केली. 'एकनाथ शिंदे आमच्या बरोबर होते तेव्हा बरे होते, पण आता तिकडे गेल्यावर जरा बिघडले  आता हेडलाइन होणार. अजित पवार घसरले, असे अजित पवार म्हणाले.

'आहे ते प्रकल्प गेले आणि म्हणतात दुसरे आणू. आहे ते ठेवता येईना आणि निघालेत दुसरे प्रकल्प आणयाला. राज्यातले प्रकल्प बाहेर गेल्याने रोजगार कमी पडल्याने पोलीस भरती डॉक्टर,वकील इंजिनिअर पोलीस भरतीत पाहायला मिळत आहे, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT