Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांची 17 जानेवारीला 'अग्निपरीक्षा'; शिवसेना पक्षप्रमुखपद राहणार की जाणार?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाची मुदत येत्या २३ जानेवारीला संपत आहे.
uddhav Thackeray
uddhav Thackeraysaam tv
Published On

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाची मुदत येत्या २३ जानेवारीला संपत आहे. तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांनी शिवसेना पक्षावर दावा सांगितल्यानं या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. त्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या प्रतिनिधी सभेची बैठक बोलावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवडणूक आयोगात केली आहे. काय आहे संपुर्ण प्रकरण पाहुयात... (Latest Marathi News)

uddhav Thackeray
Nashik BJP News: नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीचा घोळ कायम, अंतर्गत धुसफूस देखील आली समोर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांनी शिवसेना पक्षावर दावा सांगितल्यानं या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. त्याच दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) यांच्यासमोर घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.

शिवसेना पक्षाच्या कार्यकारणीला येत्या 23 जानेवारीला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. शिवसेनेच्या घटनेनुसार दर पाच वर्षांनी शिवसेना पक्षाच्या प्रतिनिधी सभेची बैठक पार पडणे आवश्यक असते.

आयोगात सुनावणी सुरु असताना प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ठाकरे गट निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात करणार आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर आत्तापर्यंत 2013 आणि 2018 ला शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेची बैठक पार पडली आहे. 2013 ला पार पडलेल्या बैठकीत प्रतिनिधी सभेने शिवसेनाप्रमुख हे पद गोठवले.

या पदाऐवजी शिवसेना (Shivsena) पक्षाचं सर्वोच्च असं शिवसेनापक्षप्रमुख पद तयार केलं. प्रतिनिधी सभेने हे पद उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं. यावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगाच्या सुनावणीत आक्षेप घेतला आहे.

uddhav Thackeray
Hasan Mushrif ED Raid: मुलाबाळांना नाहक त्रास दिला जातोय, हे योग्य नाही; हसन मुश्रीफ यांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया

2013 च्या प्रतिनिधी सभेनंतर शिवसेनेची 23 जानेवारी 2018 ला प्रतिनिधी सभा पार पडली. या सभेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. या घटनेला येत्या 23 जानेवारीला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अगोदर प्रतिनिधी सभेची बैठक पार पडणं आवश्यक आहे. अन्यथा शिवसेना पक्षप्रमुख पद घटनात्मक पेचात अडकलं आहे.

दरम्यान, 17 जानेवारीला निवडणूक आयोगात शिवसेना कोणाची याचा निर्णय होणार आहे. त्यामुळं निवडणूक आयोग ठाकरे गटाला त्या अगोदर ही परवानगी देतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. अन्यथा 17 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि त्यांचं पक्षप्रमुख याचा फैसला होणार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com