Ajit Pawar : 'अजित पवार कुणाला घाबरून बसणारा नाही'; चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar News Saam Tv
Published On

रणजीत माजगांवकर

Ajit Pawar News : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार हे हिवाळी अधिवेशनावेळी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार वक्तव्यानंतर कुठे लपून बसले होते, असा खोचक सवाल केला होता. (Latest Marathi News)

Ajit Pawar News
Sanjay Raut: पुन्हा राजकारण तापणार! संजय राऊतांची जिभ घसरली, भाजपा नेत्यांना म्हणाले; 'हा अपमान सहन करणारे सर्व....'

अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे विधान केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

चंद्रकांत पाटील म्हणाले होते,'अजित पवार यांना उठसूठ लोकांना टपली मारण्याचा दिला नाही. लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे. एखाद्या गोष्टीवर किती मोठी प्रतिक्रिया येते, याचा अनुभव अजित पवार यांना आला आहे. अजित पवार कुणाला घाबरत नाही तर चार दिवस कुठे लपून बसले होते, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार म्हणाले, 'अधिवेशन शुक्रवारी संपल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शनिवारी मुंबईला आलो. रविवारी नूतनवर्ष होतं. त्यानंतर २ जानेवारीपासून पुन्हा कामाला लागलो. कुठेही गेलो नव्हतो. कुणी अशी टीका केल्यानंतर आपल्यालाही कळलं पाहिजे. त्यात तथ्य आहे का, तपासलं पाहिजे. अजित पवार घाबरून बसणारा नाही'.

Ajit Pawar News
Ramdas Athwale: एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या 'त्या' निर्णयामुळे रामदास आठवले नाराज; म्हणाले...

दरम्यान, अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले होते, 'महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. त्यामुळे एखादा उद्योग बाहेर गेल्याने फरक पडत नाही'. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, 'राज्यातील एक जरी उद्योग बाहेर गेला तर प्रचंड नुकसान होतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यांनी दोन-चार उद्योग बाहेर गेले म्हणून काय झाले, असे वक्तव्य करू नये'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com