Ramdas Athwale: एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या 'त्या' निर्णयामुळे रामदास आठवले नाराज; म्हणाले...

एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि जोवेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युतीची घोषणा केली आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSaam Tv
Published On

Ramdas Athwale : राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीचा नवा प्रयोग एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे करु पाहत आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि जोवेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युतीची घोषणा केली आहे. मात्र ही युती रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पटलेली नाही. याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

Ramdas Athawale
Sanjay Raut: पुन्हा राजकारण तापणार! संजय राऊतांची जिभ घसरली, भाजपा नेत्यांना म्हणाले; 'हा अपमान सहन करणारे सर्व....'

एकनाथ शिंदे आणि जोगेंद्र कवाडे यांनी युतीची घोषणा करण्याआधी आमच्याशी विचारविमर्श करणे गरजेचे होते, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली. याविषयी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचेही आठवले म्हणाले.

प्रा. जोगेंद्र कवाडे हे आमचे जवळचे मित्र आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी आमच्या चर्चा करायला हवी होती. महायुतीत नवीन येणाऱ्यांचं स्वागत आहे. मात्र आमच्या चर्चेविना असा निर्णय घेणे योग्य नाही, असं आमच मत असल्याच रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Ramdas Athawale
Jalgaon Accident News: पादचारीला ट्रॅक्‍टरची धडक; अंगावरून चाक गेल्‍याने मृत्‍यू

नवीन पक्षाला महायुतीत घेताना चर्चा होणे आवश्यक होतं. भाजपशी देखील ते बोलले की नाही माहिती नाही. मात्र महायुतीत नवीन पक्षाला समाविष्ट करताना आम्हाला विश्वासात घेणे महत्वाचे आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com