Suresh Lad Joins BJP  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदार सुरेश लाड यांचा भाजप प्रवेश

Ex MLA Suresh Lad Joins BJP, Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Nandkumar Joshi

Suresh Lad Joins BJP In Mumbai :

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.

लोकसभा निवडणुका पुढील वर्षी होणार असून, त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला भाजपने धक्के देण्याची तयारी सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत-खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपमध्ये आज, शनिवारी प्रवेश केला.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी लाड यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते आणि समर्थक होते.

सुरेश लाड (Suresh Lad Joins BJP) यांनी अनेक वर्षे कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. सध्याचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि सुरेश लाड यांचे अत्यंत मैत्रिपूर्ण संबंध होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये दुरावा वाढला होता, अशी चर्चा होती. अनेकदा त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

सुरेश लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही झाला होता. अखेर लाड यांनी आज, शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. सुरेश लाड यांच्या प्रवेशाने कर्जत-खालापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

जिंकलात तर EVM मध्ये छेडछाड नाही, हरलात तर छेडछाड; बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीची याचिका SC ने फेटाळली

Winter Foods: हिवाळ्यात टिफिनमध्ये घेऊन जा असे पदार्थ, थंड झाल्यावरही चवीला लागतील छान...

SCROLL FOR NEXT