Amol Kolhe| Ajit Pawar Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: खासदार अमोल कोल्हेंना शह देण्यासाठी अजितदादांची नवी खेळी; भल्यापहाटे शिरूर मतदारसंघाची पाहणी

Ajit Pawar Vs Amol Kolhe News: खासदार अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पहाटे शिरूर लोकसभा मतदारसंघाची पाहणी केली.

Satish Daud

Ajit Pawar Vs Amol Kolhe

शिरूरबाबत मी जे बोललो तेच फायनल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिलेल्या आव्हानावर आपलं ठाम मत व्यक्त केलं आहे. माझं काही चुकलं होतं, त्यावेळीच का नाही सांगितलं? अशी प्रतिक्रिया सोमवारी अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली होती. यावर बोलताना आम्ही आमचा निर्णय घेणार, कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांनाच लखलाभ, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना चॅलेंज दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पहाटे शिरूर लोकसभा मतदारसंघाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विकासकामांचा देखील आढावा घेतला. यावेळी माध्यमांसोबत बोलताना आम्ही आमचा निर्णय घेणार, शिरूरबाबत मी जे बोललो तेच फायनल, असं ठाम मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

काल दिलेल्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्यासोबत काही संबंध नाही. माझा दौरा नियोजित होता, असंही अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभेतील गोंधळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार अमोल कोल्हे यांचे देखील निलंबन करण्यात आले आहे.

या विरोधात किल्ले शिवनेरी जुन्नर येथे मोर्चा काढण्यात येणार असून पुण्यात देखील सभा घेतली जाणार आहे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असून महायुती सरकारमध्ये सामील आहेत. पुण्यात शरद पवार गटाकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याने खासदार अमोल कोल्हे अजित पवार यांच्या निशाण्यावर आले आहेत. शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार व्यक्त करत अमोल कोल्हेंना आव्हान दिलं आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात चॅलेंज दिल्यानंतर खासदार अमोल कोल्हे आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. पुण्यात दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. त्यामुळे शरद पवार याबाबत अमोल कोल्हे यांना नेमका काय सल्ला देणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT