Sharad Pawar news  Saam Tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar : '...तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही'; राज्यपालांच्या हकालपट्टीसाठी शरद पवार आक्रमक

शरद पवार यांनी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

Rashmi Puranik

Sharad Pawar News : महाविकास आघाडीचा महामोर्च्यात आज, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी शरद पवार यांनी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. 'राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी करत हकालपट्टी वेळेत केली नाही, तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला. (Latest Marathi News)

भाजपच्या (BJP) नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत आयोजित केला. या मोर्चात तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी झाले. महाविकास आघाडीच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.

शरद पवार म्हणाले, '७० वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी मोर्चा निघाला होता. मराठी भाषिक राज्यासाठी तरुणांनी हौतात्म्य पत्करले. मराठी भाषिक अजूनही महाराष्ट्राबाहेर आहे. महामोर्च्यात महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकत्र आली. महाराष्ट्र हल्ले होत आहे. ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहे. ते महाराष्ट्रात युगपुरूषाबाबत वेगळी भाषा वापरतात. सामान्य माणसाच्या अंतकरणात एक नाव अखंड आहे, ते म्हणजे शिव छत्रपती'.

'सत्ताधारी पक्षातील नेते वादग्रस्त विधान करत आहे. महाराष्ट्र देशात स्वस्थ बसणार नाही. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यात आदराचं स्थान आहे. राज्यपाल त्याबाबत असंबंध बोलतात. विधान सभेत गेले ५५ वर्ष असे राज्यपाल पाहिले नाही. लाट वाटली पाहिजे. महात्मा फुले यांनी सामान्य माणासाला एकत्र केले. स्त्री शिक्षण दिले. ज्या व्यक्तींनी ज्ञानदान काम केले, असे शरद पवार पुढे म्हणाले.

'राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पदावरून हकालपट्टी करा. वेळेत केलं नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणत आहे की, डॉ. आंबेडर, फुले यांनी शाळा काढण्यासाठी भीक मागितली, असं म्हणत शरद पवार यांनी मंत्री चंद्रकात पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याची आठवण उपस्थितांना करून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT