Supriya Sule On NCP MLA Disqualification Verdict Saam Tv
मुंबई/पुणे

NCP Case Verdict: निकाल तोच, फक्त शिवसेनेचे नाव कापून राष्ट्रवादीचे टाकण्यात आले: सुप्रिया सुळे

NCP MLA Disqualification: 'राहुल नार्वेकर यांच्यावर महाशक्तीचा दबाव', आमदार अपात्रता निकालावर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

साम टिव्ही ब्युरो

>> मंगेश कचरे

Supriya Sule On NCP MLA Disqualification Verdict

''मला या निकालाचे आश्चर्य वाटले नाही, कारण कॉपी-पेस्ट काम चाललेले आहे. शिवसेनेचा निकाल जो आला, त्यानंतर फक्त त्याचे नाव बदलून राष्ट्रवादी काँग्रेसचे टाकलेले आहे'', असं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आलेल्या निकालावर आपली प्रतिक्रिया देताना त्या असं म्हणाल्या आहेत.

त्या म्हणाल्या की, ''राहुल नार्वेकर हे वकील आहेत. त्यांना त्यांचे अंतर्मन सांगत असेल, परंतु महाशक्तीच्या दबावापुढे ते काही करू शकत नाहीत. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांनी शून्यातून विश्व निर्माण करून हे पक्ष स्थापन केले आहेत. पण थेट पक्ष ओरबाडून इतरांच्या हातात देण्याचे काम असविधानिक पद्धतीने झालेले आहे.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''हे पाप आणि षडयंत्र अदृश्य शक्तीने केले. ही अदृश्य शक्ती देशात आज काहीही करते. आम्ही पूर्ण ताकदीने या विरोधात लढू आमचा विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल.'' (Latest Marathi News)

त्या म्हणाल्या, ''देशातला सगळ्यात भ्रष्ट पक्ष भाजप आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉल बोर्ड संदर्भात घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. देशांमध्ये सर्वात मोठा घोटाळा हा इलेक्ट्रॉल बॉण्ड आणि पेटीएमचा झालेला आहे. जर नोटाबंदी झाली तर त्यानंतरच्या तपासण्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटा कशा सापडतात, याचे उत्तर अजूनही सरकारी यंत्रणा देत नाहीत. याचा अर्थ असा आहे की, सर्वात मोठा देशातील घोटाळा तर पेटीएम आणि इलेक्ट्रॉल बोंडमध्ये झालेला आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, ''केंद्र सरकारने अतिशय चुकीचा निर्णय घेतला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. एकीकडे नोटबंदी आणि दुसरीकडे पेटीएम हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा एकाच अकाउंट वरून झालेला आहे. 27 हजार कोटी रुपयांचा पेटीएम घोटाळा झालेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT