Ajit Pawar On Vedanta Foxconn :
Ajit Pawar On Vedanta Foxconn : saam tv
मुंबई/पुणे

Vedanta : 'वेदांता'साठी 'मविआ' ने पैसे मागितले? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar On Vedanta Foxconn : राज्यात तब्बल साडेतीन लाख कोटींची आर्थिक गुंतवणूक आणू शकणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प शेवटच्या क्षणी गुजरातला गेला. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हा प्रकल्प महाविकासआघाडी सरकारमुळे गुजरातला गेला, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. यावर आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. (Ajit Pawar News Today)

वेदांताबाबत आरोप करताना मुंबईचे भाजप अध्यक्ष यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. 'मविआ'ने वेदांतासाठी टक्केवारी मागितली होती. असा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, आशिष शेलार यांच्या या आरोपाला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

'राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले. आता काही जणांकडून आमच्यावर असा आरोप केला जात आहेत, की आम्ही काहीच केले नाही, मी तर सांगतो या प्रकरणाची चौकशी करतो, दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या', असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Vedanta Foxconn News Today)

वेदांता प्रकल्पावरून उगाच राज्यातील तरूण आणि नागरिकांमध्ये संभ्रम पसरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही अजित पवारांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात हा प्रकल्प वेदांताने गुजरातला नेणार असल्याचं सांगितलं होतं, अशा अफवा पसरवल्या जात आहेत पण हे साफ चुकीचं असून मविआला बदनाम केलं जात असल्याचंही अजित पवार म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamannaah Bhatia Today Inquiry : तमन्ना भाटियाची महाराष्ट्र सायबर सेलकडून होणार चौकशी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Prajwal Revanna: सेक्स स्कँडलने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! देवेगौडांच्या नातू अन् मुलावर गुन्हा दाखल; शेकडो क्लिप्स व्हायरल

HSC SSC Result: मोठी बातमी! दहावी, बारावीच्या निकालाची तारीख ठरली; कुठे अन् कसा पाहाल निकाल?

Weather Alert: राज्यात पुढील ४ दिवसांत उष्णतेची लाट येणार; मे महिन्याचा पहिला आठवडा 'ताप'दायक ठरणार

Petrol Diesel Rate 29th April 2024: पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या देशासह महाराष्ट्रातील आजचे भाव

SCROLL FOR NEXT