Eknath shinde
Eknath shinde saam tv

CM एकनाथ शिंदेंसह गटाचे आमदार दिल्ली दौऱ्यावर; महाराष्ट्र सदनातील ४५ खोल्या बुक

महाराष्ट्र सदनातील ४५ रूम आमदारांसाठी राखीव

शिवाजी काळे

दिल्ली - राज्यात एकीकडे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण तापलेले आहे. त्यात दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekntah Shinde) उद्या शिंदे गटातील आमदारांसोबत दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. राजधानी दिल्लीतील (Delhi) महाराष्ट्र सदनातील ४५ रूम आमदारांसाठी राखीव ठवण्यात आल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दौऱ्यात नेमकी काय खलबतं शिजणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (CM Eknath Shinde Delhi Visit)

या एकनाथ शिंदे भेटीदरम्यान राज्यातील अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा करणर असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारतर्फे जी मदत हवी आहे. त्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Eknath shinde
Narayan Rane : नारायण राणेंना मोठा धक्का! हायकोर्टाने ठोठावला १० लाखांचा दंड; काय आहे प्रकरण?

राज्यात नवीन इडी सरकार स्थापन होताना गडकरी यांचा कोणताही रोल पाहायला मिळाला नाही. एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या सर्व बड्या नेत्यांची भेट घेतली होती. मात्र, गडकरींची भेट घेतली नव्हती.

मात्र,वेदांता प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटल्यानं राज्यात नाराजीचा सूर आहे. दिल्लीत महाराष्ट्राचं वजन कमी झाल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा वाटा होता. त्यामुळं एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना कठोर भूमिका घेऊ शकले नाही. अशी जनमानसात चर्चा आहे.

Eknath shinde
INDvsENG : विराट-v वाद रंगतोय मैदानाबाहेरही; जिमी नीशमचे ट्विट ठरतयं कारण

या संदर्भात शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी नाराजी बोलवूनही दाखवली आहे. दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे वजनदार नेते म्हणून गडकरी यांच्याकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना डावलून महाराष्ट्राच्या भल्यासाठी गडकरी पावलं उचलू शकतात. त्यामुळं शिंदे गट आता गडकरीच्या भेटीला जात असल्याचं समजतंय.

याचाच एक भाग म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत दिल्लीत येथे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार असल्याचं समजतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com