NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणींत वाढ; SIT द्वारे कागदपत्रांची तपासणी होणार! Saam Tv
मुंबई/पुणे

NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणींत वाढ; SIT द्वारे कागदपत्रांची तपासणी होणार!

रिपब्लिकन पक्षाचे मनोज संसारे आणि भीम आर्मीचे अशोक कांबळे यांच्याकडून समितीकडे दोन जणांची लेखी तक्रार प्राप्त झाली. त्यामुळे वानखेडेंच्या अडचणींत वाढ झाली आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhedee NCB) यांच्या कास्ट सर्टिफिकेटवर प्रश्न (caste certificate fraud )उपस्थित झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींच्या आधारे एक SIT स्थापन करून तपास सुरू केला आहे. याशिवाय दोन जणांकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबई विभागाच्या प्रमाणपत्र छाननी समितीनेही चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांच्या सांगण्यावरून नसून पोलिसांकडे आलेल्या तक्रारींच्या आधारे करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात समीर वानखडे यांचाही जबाब स्वतंत्र नोंदवला जाणार आहे. (NCB officer Sameer Wankhede's difficulties increase; Documents will be checked by SIT!)

हे देखील पहा -

समितीकडे दोन जणांची लेखी तक्रार प्राप्त झाली असून त्यापैकी एका तक्रारदाराचे नाव स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मनोज संसारे (Manosj Sansare) असून दुसऱ्या तक्रारदाराचे नाव भीम आर्मीचे अशोक कांबळे (Ashok Kamble) असल्याचे सूत्रांनी सांगितले. वानखेडे यांचे कास्ट सर्टिफिकेट बनावट असून ते मिळवण्यासाठी कागदपत्रांमध्ये छेडछाड करून त्यांनी एससी प्रवर्गातील नोकऱ्या मिळवल्या, असा आरोप या तक्रारदारांनी तक्रारीत केला आहे. समितीने या दोन्ही तक्रारदारांना ३० नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

तक्रारदाराच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर वानखेडे यांना समितीसमोर सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.नतक्रारदारांनी जन्मपत्रिका आणि निकाहनाम्याच्या आधारे ही तक्रार समितीकडे केली आहे. तक्रारदाराने वानखेडे यांचा जन्म दाखला आणि निकाहनामा पुरावा म्हणून समितीला दिला असून, त्या आधारे वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत तपास करण्यासाठी त्यांच्याकडे तीन महिन्यांचा कालावधी असून आवश्यकता भासल्यास तपास पूर्ण करण्यासाठी आणखी एक महिना दिला जाऊ शकतो, असे समितीच्या सूत्रांनी सांगितले. तसेच तपासादरम्यान हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्यास, ते प्रमाणपत्र रद्द करण्याचा हक्क समितीकडे आहे.

इतकंच नाही तर समितीला या प्रमाणपत्रातही गडबड दिसली तर ते मॅजिस्ट्रेट कोर्टाला कळवतील आणि कोर्टानेही या अहवालाशी सहमती दर्शवली तर कोर्ट स्थानिक पोलिसांना या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यास सांगू शकते. एकुणच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसतेय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT