Maharashtra Assembly Session 2022: दाऊदशी संबंध असणाऱ्या मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही- शेलार Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Session 2022: दाऊदशी संबंध असणाऱ्या मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही- शेलार

आज महाराष्ट्राच्या विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज महाराष्ट्राच्या विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी राज्यपाल आपले अभिभाषण करत असतात. त्यांच्या भाषणावर कामकाजाला सुरुवात होत असते. मात्र, राज्यपालांच्या या भाषणावेळी प्रचंड गदारोळ झालेला बघायला मिळाला आहे. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपले भाषण अर्ध्यावरच थांबवले आणि ते निघून गेले. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजनेही मग 'नवाब मलिक हाय हाय'च्या घोषणा दिले आहेत. (Nawab Malik will not back down unless resigns Ashish Shelar)

हे देखील पहा-

ज्या पद्धतीने नवाब मलिक दाऊदचा हस्तक बॉंब ब्लास्ट मधील आरोपींचा पॅटनर या मंत्रालयात विधान भावांत मंत्री म्हणून पदावर आहे. तो पर्यंत त्याचा राजीनामा घेत नाही तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आक्रमक राहणारच, असे त्यावेळी आशिष शेलार यांनी म्हणाले आहे. आणि तसेच पुढे ही खरोखर लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, महारष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यांचा एक तर राजपाल असे निघून जाणे, आणि त्याच्या भाषणाच्या वेळी त्यांचा अपमान होणं या दोन्ही गोष्टी खूपच अयोग्य आहेत.

आम्हाला धक्का देखील बसतो की हे असं होऊ कसं शकत, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावेळी सांगितले आहे. विधी मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत. सभागृहात घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई आणि जोतिबा फुलेंचा अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांविरोधामध्ये सत्ताधारी पक्ष विधीमंडळामध्ये आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू, नाशिकमध्ये हळहळ

Wedding Shopping : आली लगीन सराई....लग्नासाठी शॉपिंग करताय? मग मुंबईतील या प्रसिध्द ठिकाणी नक्कीच जा

Historical Places In Maharashtra : अहिल्यानगरमधील 'या' किल्ल्यावर झाली इतिहासातील महत्त्वाची लढाई, लहान मुलांसोबत नक्की जा

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

SBI ATM Charges: स्टेट बँकेचा ग्राहकांना झटका! ATM मधून पैसे काढणे आता महागलं; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT