सरकार पडेल ही भविष्यवाणी करून फडणवीस थकले, आता टेंडर राणेंकडे- मलिक
सरकार पडेल ही भविष्यवाणी करून फडणवीस थकले, आता टेंडर राणेंकडे- मलिक 
मुंबई/पुणे

सरकार पडेल ही भविष्यवाणी करून फडणवीस थकले, आता टेंडर राणेंकडे- मलिक

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

रामनाथ दवणे

मुंबई: महाविकास आघाडी सरकार पडणार असं वारंवार भाजप (BJP) नेत्यांकडून म्हणलं जात आहे. आज ना उद्या हे सरकार पडणार असे भाकीत अनेक नेत्यांकडून करणे सध्या सुरु आहे. आजच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राजकीय भविष्यवाणी केली आहे की, येत्या मार्च मध्ये मविआ सरकार पडणार आणि पुन्हा भाजप सत्तेत येणार. या राणेंनी केलेल्या खळबजनक दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देखील चोख उत्तर दिलं आहे.

हे देखील पहा-

नवाब मलिक म्हणाले, "सरकार पडेल ही भविष्यवाणी करून फडणवीस थकले आहेत. त्यानंतर चंद्रकांत पाटील बोलायचे आणि आता नारायण राणे यांनी टेंडर घेतले आहे. 2 वर्षात सरकारने कोरोना असताना ही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले, मदत केली. सरकारने कोरोना परिस्थिती योग्यरीतीने सांभाळली आहे. विकास कामे ही सरकारने थांबू दिली नाहीत.

अनेक महत्वाचे निर्णय सरकारने दोन वर्षात घेतले. नव्या रोजगार निर्मितीचा नवा उपक्रम ही सरकारने हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे काम पुढे ही महाविकासाचे आघाडी सरकार करेल. काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता 'त्या' कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय असा टोला मलिकांनी यावेळी नारायण राणे यांना लगावला आहे. भाजप चे जुने नेते थकले आता नव्या प्लेयर ला जबाबदारी दिली आहे. सरकार पडणार नाही स्पष्ट आहे." असं नवाब मलिक म्हणले आहेत.

आज नेमकं काय म्हणाले नारायण राणे?

मार्च महिन्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार अशी राजकीय भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे आज हे शुक्रवारी जयपूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी अशी भविष्यवाणी केली आहे. नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही, त्यामुळे तिथे तसे होत आहे. लवकरच महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल येत्या मार्च महिन्यात भाजपचे सरकार येईल आणि तुम्हाला सर्वांना अपेक्षित असा बदल दिसून येणार.

यावेळी, नारायण राणे पुढे म्हणाले काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. गोष्टी जाहीरपणे गेल्या तर एखादा महिना सरकार आणखी राहिल. मग भाजपचे सरकार येण्याची तारीख पुढे जाईल.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

Varsha Gaikawd News| महाराष्ट्राने गद्दारांना कधीच माफ केलं नाही - गायकवाड

Monsoon 2024 : आनंदाची बातमी! यंदा मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल; या दिवशी धडकणार केरळात

Dhananjay Mahadik : कोल्हापुरात राजकीय आखाडा तापला; भर सभेत धनंजय महाडिक सतेज पाटील यांच्यावर बरसले

Potatoes Benefits: बटाटे खाणं आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा फायदे

SCROLL FOR NEXT