Nawab Malik Saam TV
मुंबई/पुणे

Nawab Malik Arrested: करावे तसे भरावे- दरेकरांचा मलिकांना टोला

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: करावे तसे भरावे,या देशामध्ये कायदा सर्वश्रेष्ठ आहे. कायद्या समोर मंत्री आमदार आणि खासदार कोणीही मोठा नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा कायद्यांनी दाखवून दिला आहे. आणि कायदा हातात घेण्याचा अधिकार आपल्याला नाही आणि सत्ताधारी पक्षामधल्या लोकांना तर नाहीच नाही. जर नवाब मलिक याचा जर काय संबंध ईडीच्या कोणत्या विषात असेल, तर आता आपल्याला याक्षणी माहिती नाही. आणि त्याची चौकशी करणे आणि योग्य ती कारवाई करणे तो त्यांचा भाग आहे. आणि ईडीच्या चौकशी तपासात अटक करण्याचं महत्वाचं असेल म्हणून अटक करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. पहाटे ६ च्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर मलिक यांची सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना 1 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आणि तिथे त्यांची तब्बल सात-आठ चौकशी केली. आता अधिक चौकशीसाठी नबाव मलिक यांना ईडीकडून अटक (Arrested) करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) मनी लॉड्रिंग प्रकरणी (Money laundering case) नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी मलिकांना ताब्यात घेतलं असल्याचं समजले आहे.

काही दिवसांपुर्वी ईडीने इक्बाल कासकर आणि हसीना पारकर यांच्या घरावरही धाड टाकली होती. नबाब मलिकांना आता ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नवाब मलिकांनी एनसीबी आणि भाजपविरुद्ध आघाडी उघडली होती. मलिकांना स्वतः भाकित केलं होतं की, मला ईडीची धमकी देण्यात येत आहे, मला ईडी कारवाईचे संकेत देण्यात येत आहे, मलाही फसवण्याचा प्रयत्न होईल असं नवाब मलिकांनी आधीच सांगतिलं होतं. याशिवाय मलिकांवर पाळतही ठेवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT