मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अखेर 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केलीये. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलाय. महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका म्हणावा लागेल. काही महिन्यांत महाविकास आघाडीतील दुसरा बडा नेता ईडीच्या कोठडीत पोहोचला आहे. आज सकाळीच ईडीचे अधिकारी नवाब मलिकांच्या घरी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे (ED Arrested Minister Nawab Malik After 8 hours of Inquiry).
सध्या नवाब मलिकांना वैद्यकीय चाचणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्याची शक्यता आहे. रुग्णालयातून मलिकांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मलिकांची सकाळ ईडी अधिकाऱ्यांच्या दर्शनाने
नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ताब्यात घेतले होते. पहाटे 6 च्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर मलिक यांची 1 तास चौकशी केली गेली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
मलिकांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आणि तिथेही त्यांची तब्बल सात-आठ चौकशी केली. आता अधिक चौकशीसाठी नबाव मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी मलिकांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी ईडीने इक्बाल कासकर आणि हसिना पारकर यांच्या घरावरही धाड टाकली होती.
गेल्या अनेक महिन्यांपासून नवाब मलिकांनी एनसीबी आणि भाजपविरुद्ध आघाडी उघडली होती. मलिकांना स्वतः भाकित केलं होतं की, मला ईडीची धमकी देण्यात येत आहे, मला ईडी कारवाईचे संकेत देण्यात येत आहेत. मलाही फसवण्याचा प्रयत्न होईल, असं नवाब मलिकांनी आधीच सांगतिलं होतं. याशिवाय, मलिकांवर पाळतही ठेवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.