Vashi Plaza Wall Collapse Video  Saam Tv News
मुंबई/पुणे

Vashi Wall Collapse VIDEO : रात्रभर संततधार, सोसायटीची भिंत खचली; १५ बाईक अन् टेम्पो दबला; पठ्ठ्याची ३ सेकंदात मृत्यूला हुलकावणी

Vashi Plaza Wall Collapse Video : नवी मुंबईतील वाशी येथे काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेकांची पावसामुळे दैणा उडत आहे.

Prashant Patil

नवी मुंबई : राज्यात ठिकठिकाणी पावासाचा हाहाकार: पाहायला मिळत आहे. नवी मुंबईत देखील पावसाची संततधार सुरु आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वाशी प्लाझा येथील आधारभिंत कोसळून खाली खचली गेली आहे. या अपघातात १० ते १५ दुचाकी आणि एका टेम्पोचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याचं देखली समोर आलं आहे. भिंत कोसळल्याचा धक्कादायक व्हिडिओ देखील आता समोर आलं आहे. यात एका व्यक्तीनं अवघ्या ३ सेकंदात मृत्यूला हुलकावणी दिल्याचं दिसत आहे.

नवी मुंबईतील वाशी येथे काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेकांची पावसामुळे दैणा उडत आहे. कामावर जाणाऱ्यांचे देखील प्रचंड प्रमाणात हाल होताना दिसत आहे. मुंबईची लाईनलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल देखील धीम्या गतीने चालत आहेत. त्यामुळे लोकांना कामावर जायला देखील उशीर होताना दिसत आहे. त्याचदरम्यान, वाशी प्लाझा येथील एका कमर्शियल सोसायटीची आधारभिंत खचली असल्याची घटना समोर आली आहे. यात पार्क केलेल्या १० ते १५ दुचाकी आणि एक टेम्पो दबल्या गेल्याचं समोर आलं आहे. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. त्यात अजून एक गोष्ट दिसत आहे की, एक व्यक्ती त्या सोसायटीतून बाहेर पडताना दिसत आहे आणि अवघ्या तीन सेंकदात ती भिंत खचली. म्हणजे या व्यक्तीनं अवघ्या तीन सेकंदात आपल्या मृत्यूला हुलकावणी दिल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडिओ आता प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, मान्सूनने कोकणाचा संपूर्ण भाग व्यापला असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग मान्सूनची एन्ट्री झाल्याचे दिसून आले आहे. राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास चारही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचसोबत संपूर्ण कोकणमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पुढील दोन ते तीन दिवस मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural Beauty Tips : ग्लोइंग त्वचा आणि लांब सडक केस पाहिजेत? मग काय खावं समजून घ्या

Maharashtra Live News Update: - कल्याण, डोंबिवली, नागपूर, मालेगाव नतंर अमरावतीत सुद्धा 15 ऑगस्टला मटन चिकनची विक्री बंद

Supreme Court: आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही: सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT