CIDCO  Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai: सिडकोची उलवे, बामणडोंगरी येथील घरे ६ लाख रुपयांनी स्वस्त, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर निर्णय

CIDCO Home Prices Reduce :शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ(CIDCO)कडून बामणडोंगरी, उलवे नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात आली आहेत. येथे घर लागलेल्या नागरिकांनासाठी खूशखबर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

CIDCO House Price Reduces By Government:

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ(CIDCO)कडून बामणडोंगरी, उलवे नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात आली आहेत. येथे घर लागलेल्या नागरिकांनासाठी खूशखबर आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर सिडकोने या घरांच्या किंमती कमी करण्याच्या निर्णय घेतला आहे.

बामणडोंगरी आणि उलवे येथील घरांच्या किमती ६ लाखांनी कमी होणार आहेत. सिडकोच्या या घरांसाठी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी या घरांसाठी ड्रॉ काढण्यात आला होता. त्यात एकूण ४,८६९ अर्जदारांची येथील गृहनिर्माण प्रकल्पासाठी विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. (Latest News)

सिडकोने नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये गृहनिर्माण योजना तयार केली आहे. या योजनेतून अनेक लोकांना त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, घराची मूळ किंमत ३५.३० लाख रुपये असल्यास ते घर २९.५० लाख रुपयांना उपलब्ध होणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २.५० लाख रुपये अनुदानाचा लाभ मिळाल्यानंतर घर २७ लाख रुपयांना उपलब्ध होईल.

या घरांच्या किंमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.'बामनडोंगडी, उलवे येथील अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) श्रेणीतील आहे. PMAY अंतर्गत उत्पन्न मर्यादा ३ लाखांपर्यंत असल्याने अर्जदारांना घरासाठी ३४ लाख रुपये देण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या अर्जदारांना दिलासा देण्यासाठी घरांच्या किंमती ६ लाख रुपयांनी कमी करण्याचे निर्देश सिडकोला देण्यात आले आहेत. त्यानुसार, घरांच्या किंमती ६ लाखांनी कमी केल्या आहेत. आणि २.५ लाखांच्या अनुदानासह अर्जदारांसाठी घरांची किंमत २७ लाख असेल. मी सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करतो', असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT