Republic Day 2024: सह्याद्री रॉक ऍडवेंचर संघाची कामगिरी, ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ७५ मिनिटात मनमाडचा थम्स अप सुळका केला सर

Republic Day 2024: सह्याद्री रॉक एडवेंचर्स यांच्या स्वयंसेवकांनी मनमाड येथील प्रसिद्ध थम्सअप सुळका म्हणजेच हडबीची शेंडी अवघ्या ७५ मिनिटात सर केला आहे.
SAHYADRI ROCK ADVENTURES
SAHYADRI ROCK ADVENTURESsaam tv news
Published On

>>अभिजित देशमुख

Sahyadri Rock Adventures:

कल्याणमधील सुप्रसिद्ध गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक एडवेंचर्स यांच्या स्वयंसेवकांनी मनमाड येथील प्रसिद्ध थम्सअप सुळका म्हणजेच हडबीची शेंडी अवघ्या ७५ मिनिटात सर करत देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करून देशाप्रती आदर व्यक्त केला आहे. सोबतच देशाचे राष्ट्रगीत सुळक्यावर गाऊन एक अनोख्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

थम्स अप सुळका याची एकूण उंची १८० फूट आहे. मनमाड येथील कातरवाडीपासून सुळक्यापर्यंत पोहोचण्यास सुमारे एक तासाचा ट्रेक करावा लागतो.सदर सुळक्याची चढाई अतिअवघड श्रेणीत मोडत असल्याने सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी लागते.

SAHYADRI ROCK ADVENTURES
IND vs ENG 1st Test 1st Inning: बॅझबॉलवर टीम इंडियाचे फिरकी गोलंदाज पडले भारी! इंग्लंडचा पहिला डाव २४६ वर संपुष्टात

सुळक्याचा भूतकाळ पाहता मागील वर्षी तांत्रिक चुकीमुळे दोन गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही दुर्घटना झाल्यानंतर सदर सुळक्यावर कोणीही चढाई केली नव्हती. पण देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याणच्या सुप्रसिद्ध सह्याद्री रॉक एडवेंचर्स या संघाने ७५ मिनिटात या सुळक्यावर यशस्वी चढाई पूर्ण करत देशाप्रती अनोख्या पद्धतीने अभिवादन व्यक्त केलं आहे. (Latest sports updates)

SAHYADRI ROCK ADVENTURES
IND vs ENG,1st Test: बेन स्टोक्सने पहिल्याच दिवशी केलेली ही मोठी चूक इंग्लंडला महागात पडणार

सदर सुळका हा अतिकठीण श्रेणीमध्ये मोडत असल्याने या सुळक्यावर आधुनिक गिर्यारोहणाचे साहित्य वापरून सदर चढाई यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. सदर मोहिमेत सह्याद्री रॉक एडवेंचर्स या संस्थेचे दर्शन देशमुख, पवन घुगे, भूषण पवार ,संजय करे ,राहुल घुगे उर्फ बारक्या व सुप्रसिद्ध युट्युबर प्रशील अंबादे हे सामील होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com