Fight Between Two groups Saam tv
मुंबई/पुणे

Fight Between Two groups : कचऱ्याचा वाद टोकाला; उरुसदरम्यान २ गटात तुंबळ हाणामारी,VIDEO

Fight Between Two groups in navi Mumbai : कचऱ्यावरून वाद टोकाला गेल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईत उरुसदरम्यान २ गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

नवी मुंबई : नवी मुंबईत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईतील खारघरच्या ओवे गावातील उरुसमध्ये दोन गटात तुफान हाणामारीची झाली. कचरा फेकण्यावरून हा वाद टोकाला गेला. त्यानंतर उरुसदरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या खारघरमधील बाबा अमीर शाह दर्ग्यावर उरुसचं आयोजन करण्यात आलं होतं. या उरुसदरम्यान पूर्व वैमन्यस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. या दर्ग्यासमोरच जोरदार हाणामारी झाली. यावेळी काहींनी खुर्च्यांची तोडफोड केली. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून हा वाद झाल्याचे समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

नऊ महिन्यापूर्वी तक्रारदाराच्या चुलत भावाच्या जागेवर कचरा टाकल्यामुळे हटकल्याचा राग आरोपींनी मनात ठेवला. त्यानंतर खारघरमधील आयोजित उरूसात आरोपींनी तक्रारदारांच्या चुलत भावाला जाणीवपूर्वक हटकले. त्यानंतर आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याबाबत आता खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

खारघरमध्ये एका उरुसचं आयोजन करण्यात आलं होते. या उरुससाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. उरसमध्येच पूर्व वैमन्यस्यातून दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटात काही ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे. काही जण वाद सोडवताना दिसत आहे. दोन्ही गटातील लोक एकमेकांना शिवीगाळ करताना दिसत आहेत. उरुससाठी तरुण मंडळींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. वाद टोकाला गेल्यानंतर दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक केली. दोन गटाच्या वादानंतर दर्गा परिसरात एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro New Line: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार, उद्घाटनाची तारीख ठरली, कोणत्या भागाला होणार सर्वाधिक फायदा?

Maharashtra Live News Update: मंगळवेढा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीला स्थगिती ,जिल्हाधिकारी यांची माहिती

Malaika Arora: मलायका अरोरा ज्याच्या प्रेमात पडली; तो हर्ष मेहता आहे कोण?

Accident: महामार्गावर अपघताचा थरार! भरधाव टेम्पो अन् कारची समोरासमोर धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

पुण्यातील बुधवार पेठेत भयंकर घडलं; चिठ्ठी लिहून तरूणीनं ९व्या मजल्यावरून उडी घेतली, आत्महत्या करण्यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT