TALOJA SECTOR 10 HORRIFIC CAR ACCIDENT: TWO DEAD, EIGHT SERIOUSLY INJURED IN NAVI MUMBAI Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : नवी मुंबईत भीषण अपघात! भरधाव कारने १० जणांना चिरडलं; २ जणांचा मृत्यू

Navi Mumbai Accident News Update : नवी मुंबईतील तळोजा सेक्टर १० येथे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

Alisha Khedekar

नवी मुंबईतील तळोजा सेक्टर १० परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिक XEV कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने रस्त्यावरील नागरिकांसह अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील तळोजा सेक्टर १० परिसरात आज सकाळच्या सुमारास इलेक्ट्रिक XEV कार भरधाव वेगात जात होती. भरधाव वेगात असणाऱ्या या कारने रस्त्यावरील ५ वाहनांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की गाड्यांचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत २ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघात घडल्यानंतर कारचालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.

या भीषण अपघाताचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी परिसरातील वाहतूक सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली असून दोषी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तळोज्यातील या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस तपासानंतर या अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune : मुंबई-पुणेकरांनो 'या' पिकनिक स्पॉटवर एकदा जा, पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसते ठिकाण

Temple Stampede : श्रावण सोमवारी मंदिरात चेंगराचेंगरी, ७ भाविकांचा मृत्यू, १२ गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

Shocking : महिलांचे आणि पती पत्नीचे खासगी क्षण रेकॉर्ड, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे बसवले; कारपेंटरचा धक्कादायक प्रकार उघड

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! कार अन् दोन रिक्षांची एकमेकांना धडक, भीमाशंकरला गेलेले १२ भाविक गंभीर

SCROLL FOR NEXT