Pune : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! १ नोव्हेंबरपासून अर्ध्या तिकिटात करता येणार PMP बस प्रवास

Pune PMP Bus News : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! १ नोव्हेंबरपासून PMP बसच्या नियमित तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. आधार किंवा पॅन कार्ड दाखवून अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार आहे.

पुण्यात PMP बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना PMP बसमधून प्रवास करताना तिकिटाच्या दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना आता अर्ध्या तिकिटात बसने प्रवास करता येणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

PMP प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दररोज बसने प्रवास करणाऱ्या हजारो ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना पासमध्ये सवलत दिली जात होती. आता नियमित तिकीट दरातही ५० टक्के सवलत मिळणार असल्याने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक फायदा होणार आहे.

मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना काही महत्त्वाच्या अटींचे पालन करावे लागणार आहे. सवलतीचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आपले ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड दाखवता येणार आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक स्वस्त आणि सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.