Navi Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Crime: बापाचं हैवानी कृत्य! ९ वर्षांच्या मुलीला अश्लिल व्हिडीओ दाखवत लैंगिक अत्याचार, नवी मुंबई हादरली

Navi Mumbai Police: नवी मुंबईमध्ये बापाने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. अश्लिल व्हिडीओ दाखवत त्याने हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

Summary -

  • नवी मुंबईतील कोपरखैराणे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना

  • आरोपी वडिलाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

  • मुलीची आई मूकबधिर असून तज्ज्ञांच्या मदतीने निवेदन घेतले

  • आरोपी फरार असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली

बापाने आपल्या ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली. मुलीला अश्लिल व्हिडीओ दाखवत आरोपी तिच्यासोबत अश्लिल चाळे करायचा. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात येताच तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बापाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नवी मुंबईच्या कोपरखैराणे येथे घडली. याठिकाणी आरोपी बायको आणि मुलीसोबत राहते. आरोपी मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. पीडित मुलीच्या आईच्या लक्षात ही बाब आली. पण मुलीची आई मूकबधिर असल्यामुळे ती काय बोलते हे पोलिसांना समजत नव्हते. पोलिसांनी तज्ज्ञांच्या मदतीने महिलेशी संवांद साधला आणि या प्रकरणाची नोंद करून घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

वडिलांच्या या कृत्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली होती. आई घरामध्ये नसल्यावर आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. सुदैवाने मुलीसोबत घडलेला प्रकार आईच्या लक्षात आल्यामुळे तिने वेळीच पोलिस ठाणे गाठले. महिलेने पोलिसांना सांगितले की, आरोपी नवऱ्याने यापूर्वीही तिच्यावर अत्याचार करण्याचा आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: 'पदरावर देवी, हातावर मेंहदी...'; रश्मिका मंदान्नाच्या मेहंदी समारंभाचे सुंदर फोटो व्हायरल

Health Care : उन्हाळ्यात दही खाल्याने काय होते? जाणून घ्या

Nashik Tourism : हजारो वर्षांचा इतिहास दडलाय 'या' किल्ल्यात, नाशिकमध्ये घ्या ट्रेकिंगचा अनोखा अनुभव

Blocked arteries: हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्यावर हातामध्ये दिसतात ही लक्षणं; शरीरातील बदल वेळीच ओळखा

Shocking: बंद कारमध्ये आढळले दोघांचे मृतदेह अन् दारू, दार उघडताच पोलिसही चक्रावले; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT