Police Recruitment Saam tv
मुंबई/पुणे

Police Recruitment : पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं; जळगावहून नवी मुंबईत भरतीला आलेल्या तरुणाचा उपाचारादरम्यान मृत्यू

candidate dies white police recruitment : जळगावहून नवी मुंबईत पोलीस भरतीला आलेल्या तरुणाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही प्रतिनिधी

नवी मुंबई : राज्यातील विविध भागात पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहेत. पोलीस प्रशासनाकडून पोलीस भरतीच्या प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांच्या शारीरिक योग्यता चाचण्या घेण्यात येत आहेत. याच पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एसआरपी पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने त्याचं पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे.

नवी मुंबईतील तळोजा डायघर येथे एसआरपी पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. या पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवाराबाबत दुर्देवी घटना समोर आली आहे. अक्षय बिऱ्हाडे असे या उमेदवाराचे नाव आहे. अक्षय बिऱ्हाडे हा उमेदवार धावतपट्टीवर धावताना कोसळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, या अक्षय बिऱ्हाडे यांचा उमेदवारचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

तळोजा डायघरमध्ये एसआरपी पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून यातील एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अक्षय बिऱ्हाडे नावाचा हा उमेदवार धावपट्टीवर धावत असताना मैदानात कोसळला होता. अक्षय बिऱ्हाडे तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अक्षय हा जळगावमधील रहिवासी आहे. तो तळोजा येथे भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. 500 मीटर धावपट्टी पूर्ण होण्याआधीच अक्षय मैदानात कोसळला. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केल. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अक्षय बिऱ्हाडे याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर अक्षय बिऱ्हाडे राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लोणावळ्यातील भुशी डॅमवर तरूणाचा किळसवाणा प्रकार; व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार; CM फडणवीसांनी दिलं मोठं आश्वासन| VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट

Maharashtra Live News Update: सिंदखेडराजा तालुक्यात तुफानी पाऊस नदी नाल्यांना पूर

Sant Dnyaneshwar Maharaj: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी भक्ताकडून चांदीची राखी अर्पण

SCROLL FOR NEXT