Ladki Bahin Yojana Saam Tv
मुंबई/पुणे

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेत गैरप्रकार! पत्नीच्या नावाने भरले तब्बल ३० अर्ज; २६ अर्जांचे पैसेही मिळाले, पाहा VIDEO

Mukhyamantri Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार झाला असून सातारामधील एका व्यक्तिने आधार कार्डचा गैरप्रकार करत पत्नीच्या नावाने तब्बल ३० भरुन हजारो रुपये लाटल्याचे समोर आले आहे.

Gangappa Pujari

सिद्धेश म्हात्रे| नवी मुंबई, ता. ३ जून २०२४

Ladki Bahin Yojana Fraud Navi Mumbai: राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. राज्यभरातील महिला वर्गाकडून या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत असून अर्ज भरण्यासाठी, पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. अशातच लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार झाला असून सातारामधील एका व्यक्तिने आधार कार्डचा गैरप्रकार करत पत्नीच्या नावाने तब्बल ३० भरुन हजारो रुपये लाटल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य सरकारच्या बहूचर्चित लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने तब्बल 30 अर्ज दाखल करीत शासनाचे हजारो रूपये लाटले आहेत. खारघरमधील महिला पुजा प्रसाद महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आला आहे.

पूजा महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर निलेश बाविस्कर यांनी शोध घेतला असता पुजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाले असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यांच्या आधार कार्डला सातारा येथील पोपट जाधव नामक व्यक्तिचा मोबाईल नंबर ॲड झाला होता.

याबाबत अधिक माहिती मिळवली असता या पोपट जाधव या व्यक्तीने व्यक्तीने आपली पत्नी प्रतिक्षा जाधव नावे एक दोन नव्हेतर तब्बल ३० अर्ज भरल्याचे दिसून आले. यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सध्या सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक भाजप नेत्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT