ख्रिसमसच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईमध्ये चर्चला आग लागल्याची घटना घडली. कोपरखैरणे येथील एका चर्चच्या तळमजल्यावर आग लागली. या आगीमुळे एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरखैरणेमधील एका चर्चमध्ये भीषण आग लागली. चर्चमध्ये गर्दी असताना ही घटना घडली.चर्चमधील तळमजल्यावर ही आग लागली. आग लागल्यामुळे चर्चमध्ये आलेले अनेक जण पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर अडकले होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन चर्चमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटांमध्येच आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. ख्रिसमसनिमित्त कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या स्टेज, लाईटची वायर आणि बाहेर उभ्या असलेल्या काही वाहनांना आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.