Navi Mumbai News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai : मी आयुष्य संपवतोय! पत्नी, मेहुण्याला व्हिडीओ कॉल करत तरुणाने संपवलं जीवन

पत्नी आणि मेहुण्याला कॉल करत एका ३५ वर्षीय तरुणाने पाण्यात उडी मारून घेत आपली जीवनयात्रा संपवली.

साम टिव्ही ब्युरो

नवी मुंबई : राज्यात एकीकडे दिवाळीचा (Diwali) सण उत्साहात साजरा केला जात असताना दुसरीकडे नवी मुंबईच्या वाशी परिसरातून एक दुर्देवी घटना समोर आली. पत्नी आणि मेहुण्याला कॉल करत एका ३५ वर्षीय तरुणाने पाण्यात उडी मारून घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

प्रशांत वायकर (वय ३५ रा. चेंबूर मुंबई) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. प्रशांतने वाशी येथील (Mumbai) खाडी ब्रिजवरून आपल्या पत्नीला व मेहुण्याला व्हिडीओ कॉल केला. मी आत्महत्या करतोय असं सांगत व्हिडीओ कॉल सुरू प्रशांत यांनी असताना खाडीत उडी मारली.

आपल्या अंगावर कर्ज झालं असल्याने आत्महत्या करत असल्याचं प्रशांतने व्हिडीओमध्ये सांगितलं. तसेच याबाबत कुणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी सांगितले. प्रशांतचा मृतदेह पुलाखालून पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना एका मच्छीमार व्यक्तीला दिसला होता. मात्र तो अजूनही सापडला नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, नवी मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र बराच वेळ शोध मोहीम राबवल्यानंतरही प्रशांत यांचा शोध लागला नाही. वाशी पोलीस याबद्दल तपास करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांचे बालेकिल्ले ढासळले, ११ ठिकाणी भाजपचा दारुण पराभव; कोणत्या नेत्यांना फटका बसला?

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; या तारखेला करणार युतीची घोषणा

Famous Actress Divorce : प्रसिद्ध अभिनेत्रीचा 16 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर शेअर केली भावुक पोस्ट

Pune Politics: पुण्यात राजकीय भूकंप! शरद पवारांना मोठा धक्का, प्रशांत जगताप यांचा राजीनामा

Ring Design : अंगठ्यांचे हे 5 लेटेस्ट डिझाईन्स; हातात घालताच प्रत्येकजण विचारेल, "कुठून घेतली?"

SCROLL FOR NEXT