Pune News : कोर्टात केस नीट करू नका; पुणे जिल्हा न्यायालयाचा अजब आदेश

कोर्ट सुरू असताना महिला कोर्टात केस नीट करू नका, असा आदेश पुणे जिल्हा न्यायालयाने काढला होता.
Pune District Court
Pune District CourtSaam TV
Published On

पुणे : आजवर तुम्ही कोर्टात मोबाईल वाजवण्यास मनाई, शांतता राखा, असे आदेश लावलेले बघितले असतील. मात्र, पुणे (Pune) जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने वकिलांनाही बुचकाळ्यात टाकलंय. कोर्ट सुरू असताना महिला कोर्टात केस नीट करू नका, असा आदेश पुणे जिल्हा न्यायालयाने काढला होता. कोर्टाचा या आदेशाची बरीच चर्चा रंगली होती. आता हा आदेश मागे घेण्यात आला आहे.

Pune District Court
Ulhasnagar News : सिंघम बनायचं असेल तर धर्मांतर करणाऱ्यांना पकडा; नितेश राणे पोलिसांवर भडकले

कोर्टाच्या आदेशात काय होतं?

महिला वकिलांनी कोर्ट सुरू असताना केस नीट करू नका, असा आदेश पुणे जिल्हा कोर्टाने (Pune Court) काढला होता. याबाबतची नोटीस कोर्टाबाहेर लावण्यात आली होती. नोटीशीमध्ये "हे वारंवार निदर्शनास आलं आहे की महिला वकील अनेकदा कोर्टामध्येच आपले केस व्यवस्थित करत असतात. हे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा आणणारे किंवा विचलित करणारे असे आहे. त्यामुळे महिला वकिलांना अशी कृत्यं न करण्याचा सल्ला याद्वारे दिला जात आहे" असे लिहिण्यात आलं होतं.

कोर्टाच्या या नोटीशीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा आदेश २० ऑक्टोबर रोजी देण्यात आला होता. दरम्यान, या आदेशाची सर्वत्र चर्चा रंगल्यानंतर कोर्टाने आदेश पुन्हा मागे घेतला आहे. 'नोटीसचा हेतू केवळ न्यायालयीन कामकाजाचा डेकोरम राखण्यासाठी आहे. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता', असं कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com