Atal Setu Saam Tv
मुंबई/पुणे

Atal Setu: कार थांबवली... थेट समुद्रात उडी मारली, अटल सेतूवर आत्महत्येचे सत्र सुरूच

Navi Mumbai Police: अटल सेतूवरून उडी मारून माटुंगा येथे राहणाऱ्या व्यावसायिकाने आत्महत्या केली. तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक आत्महत्येच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता नवी मुंबई - मुंबईला जोडणारा अटल सेतू नवा सुसाइड पाइंट बनला आहे. अटल सेतूवर आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अशातच एका ५२ वर्षीय व्यावसायिकाने अटल सेतूवरून समुद्रात उडी मारत आत्महत्या केली. फिलिप हितेश शाह असं या व्यावसायिकाचे नाव आहे. तीन दिवसांतील दुसरी घटना आहे.

फिलिप शाह हे मुंबईतील माटुंगा परिसरामध्ये राहत होते. २ ऑक्टोबरला म्हणजे बुधवारी त्यांनी अटल सेतूवर आपली कार थांबवली आणि समुद्रात उडी मारत जीवन संपवले. नवी मुंबई पोलिसांनी शोधमोहिम करत फिलिप यांना शोधून समुद्रातून बाहेर काढले. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या कारची तपासणी केली त्यांना त्यामध्ये आधारकार्ड सापडले. यावरून मृत व्यक्ती फिलिप शहाची ओळख पटली. त्यानंतर त्यांच्या कुटंबीयांशी संपर्क करण्यात आला. त्यांच्या कारमध्ये कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून फिलिप तणावाखाली होते. याच कारणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.

फिलिप शहा यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. एका कार्यक्रमाला जायचे असल्याचे सांगून ते सकाळी घराबाहेर पडले पण ते घरी आलेच नाही. फिलिप शहा यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

दोन दिवसांपूर्वीच एका बँकरने अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली होती. सुशांत चक्रवर्ती असे या बँकरचे नाव होते. १ ऑक्टोबरला संध्याकाळी त्याचा मृतदेह सापडला. कंपनीच्या कामाच्या दबावामुळे सुशांतने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केलाय. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. त्याआधी ५ सप्टेंबरला पुण्याच्या एका बँकरने याच ठिकाणी आत्महत्या केली होती. कामाच्या दबावाला कंटाळून त्याने देखील टोकाचे पाऊल उचलले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT