Atal Setu: पुण्याच्या बँकरने अटल सेतूवरून उडी मारली, कामाच्या दबावाला कंटाळून टोकाचा निर्णय

Banker End Life By Jumping From Atal Setu: पुण्यातील ३५ वर्षीय बँकरने नवी मुंबईतल्या अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येमागचे धक्कादायक कारण समोर आलं.
Atal Setu: पुण्याच्या बँकरने अटल सेतूवरून उडी मारली, कामाच्या दबावाला कंटाळून टोकाचा निर्णय
Banker End Life By Jumping From Atal SetuSaam Tv
Published On

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

नवी मुंबईच्या अटल सेतूवरून उडी मारून बँकरने आत्महत्या केलीची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३५ वर्षीय बँकरने समुद्रात उडी मारल्याचे कळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत उशिर झाला होता. पाण्यामध्ये बुडून बँकरचा मृत्यू झाला त्याचा मृतदेह बाहेर काढून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ३५ वर्षीय बँकरने नवी मुंबईतल्या अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. ॲलेक्स रेगी असे या बँकरचे नाव असून तो पिंपरी येथील रहिवासी होता. ॲलेक्स एका बैठकीसाठी मुंबईत आला होता. यावेळी तो चेंबूर येथे राहणाऱ्या सासऱ्याला भेटण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो पुण्याला परत निघाला होता. पण वाटेमध्ये अटल सेतू पुलावर कार थांबवून त्याने समुद्रात उडी मारली.

Atal Setu: पुण्याच्या बँकरने अटल सेतूवरून उडी मारली, कामाच्या दबावाला कंटाळून टोकाचा निर्णय
Navi Mumbai : नूडल्स बनवणाऱ्या कंपनीवर अचानक मनसेची धडक; समोर जे आलं ते पाहून अनेकांचे होशच उडाले, पाहा VIDEO

ॲलेक्सवर कामाचा प्रचंड दबाव असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ॲलेक्सने कुठलीही सुसाईड नोट लिहिली नव्हती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून मॉनिटरिंग टीमने कार थांबलेली पाहिली आणि पोलिसांना इशारा दिला. पण पोलिस पोहोचण्याआधीच ॲलेक्सने उडी मारली. त्याला वाचवण्याचा बचाव पथकाने प्रयत्न केला. पण त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह बाहेर काढला असून त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अलेक्सच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Atal Setu: पुण्याच्या बँकरने अटल सेतूवरून उडी मारली, कामाच्या दबावाला कंटाळून टोकाचा निर्णय
Navi Mumbai: आईने दुसऱ्या मजल्यावरून अभ्रक खाली फेकले; अन्... धक्कादायक घटनेनं मुंबई हादरली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com