BMC Bharti: मुंबई महापालिकेत तब्बल ९२००० पगाराची नोकरी, शिक्षण अन् वयाची अट काय? जाणून घ्या

BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत सध्या भरती सुरु आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत वॉर्ड निरिक्षक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ९२००० रुपये पगार मिळणार आहे.
BMC Bharti
BMC BhartiSaam Tv
Published On

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हालाही महानगरपालिकेत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत वॉर्ड इन्स्पेक्टर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. (BMC Recruitment 2024)

BMC Bharti
ISRO Jobs: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; महिना २ लाख पगार; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

वॉर्ड निरीक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. त्याचसोबत त्याने MS-CIT आणि टायपिंगचा कोर्स केलेला असावा. त्यामुळे ज्या तरुणांचे नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांना ९२,००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत १७८ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.याबाबत सर्व माहिती mcgm.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (BMC Recruitment)

BMC Bharti
Government Job: दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, पण कुठे? वाचा सविस्तर

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.एकूण २०० गुणांची ही परीक्षा असणार आहे. एमसीक्यू टाइप परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. (BMC Jobs)

BMC Bharti
Mumbai Metro Job: खुशखबर! मुंबई मेट्रोत नोकरीची संधी; २००००० रुपये पगार; असा करा अर्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com