Atal Setu Mumbai: अटल सेतू तब्बल १० तासांसाठी राहणार बंद; मुंबईकरांचा होणार खोळंबा, काय आहे कारण?

Atal Setu Latest News: अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. अटल सेतू तब्बल १० तासांसाठी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
Atal Setu Latest News
Atal Setu Latest NewsSaam TV
Published On

Atal Setu will be closed for 10 Hours

अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. अटल सेतू तब्बल १० तासांसाठी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रविवारी मुंबईत मॅरेथॉन होणार असल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Atal Setu Latest News
Rain Alert: महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट...

मुंबईतील या वर्षीची मॅरेथॉन ही पहिल्यांदाच नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या अटल सेतूवर आयोजित करण्यात आली आहे. त्यामुले अटल सेतूवरून शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण १० तासांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

यामध्ये अत्यावश्यक वाहनांना सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यातून द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने गव्हाण फाटा मार्गे बेलापूर- वाशी मुंबई अशी वळवण्यात येणार आहे.

तर जेएनपीटी आणि उरणहून मुंबईत जाणारी वाहनेही गव्हाण फाटामार्गे वाशी या मार्गाने वळविण्यात आली आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करू, अशा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. या सागरी सेतूवरुन दिवसाला ७० हजार वाहने धावतील असा, दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला होता. मात्र महिन्याभरात या सागरी सेतूवरुन ८ लाख १३ हजार ७७४ वाहने धावली असून दिवसाला सरासरी २७ हजार वाहने धावत असल्याचं समोर आलं आहे.

Atal Setu Latest News
Breaking News: मुंबईसह, पुण्यात साखळी बॉम्बस्फोट होणार; पोलीस नियंत्रण कक्षाला फोन, यंत्रणांमध्ये खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com