देशासह राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून पुढील ४८ तासांत अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. काही जिल्ह्यांत गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. अगदी जानेवारी महिन्यात पडलेला थंडीचा कडाका आता परतीच्या वाटेवर आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत अनेक राज्यांमधून थंडी कायमचीच गायब होईल आणि यंदाच्या हिवाळी हंगामाची सांगता होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.
हवामानात बदल होत असतानाच पुढील ३ ते ४ दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे.
IMDच्या अंदाजानुसार,उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान पाऊस होईल. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन भागातील जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीसह मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
याशिवाय उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, बिहार आणि ओडिशाच्या विविध भागात १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान गडगडाट आणि विजांचा कडकडाटसह गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.