Navi Mumbai-Mumbra Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai-Mumbra : दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, मुंब्रा ते नवी मुंबईला प्रवास सुसाट होणार, वाचा सविस्तर

Airoli Katai Naka To Mumbra New Road: नवी मुंबईवरुन मुंब्र्याला जाता येणार आहे. कटाई नाका ते मुंब्रा यासाठी नवीन उन्नत प्रकल्पासाठी मान्यता मिळाली आहे.

Siddhi Hande

नवी मुंबई, डोंबिवली, मुंब्रा या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार

मुंब्रा ते कटई नाका अशा उन्नत प्रकल्पाला परवानगी

नवी मुंबईवरुन थेट मुंब्रा गाठता येणार

दीड तासाचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत होणार

नवी मुंबई ते मुंब्रा जोडण्यासाठी एक नवीन प्रकल्प सुरु होणार आहे. कटाई नाका ते मुंब्रा असा ६.७१ किमी लांबीच्या उन्नत प्रकल्पाला परवानगी मिळाली आहे. किनारपट्टी क्षेत्र नियमनासंबंधीची परवानगी मिळाली आहे. या प्रकल्पात खारफुटीचा काही भाग आहे. एमएमआरडीएने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

नवी मुंबई ते मुंब्रा जोडले जाणार (Navi Mumba-Mumbra New Road)

नवीन मुंबईसह, मुंब्रा, डोंबिवली, शीळ फाटा या परिसरात नेहमी वाहतूक कोंडी असते. त्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. यासाठी ऐरोली ते मुंब्रा असा विशेष मार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरडीएने प्रकल्प हाती घेतला आहे. या मार्गामुळे ठाणे- नवी मुंबई, पुढे बदलापूर, कल्याण डोंबिवलीतीलदेखील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. यामुळे थेट मुंब्र्यावरुन नवी मुंबईला जाता येणार आहे.

मुंब्रा-कटई नाका (Airoli Katai Naka To Mumbra Road)

या मार्गाचा विस्तार करण्यासाठी मुंबई-काटई नाका उन्नत मार्गाचे नियोजन केले जाणार आहे. देसाई खाडीवरून जाणाऱ्या या मार्गाला आता महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. या प्रकल्पाची ५७० चौरस फीट जागा या ठिकाणी आहे. एकूण १६ हजार २७९.९१ चौरस मीटर क्षेत्राचा समावेश आहे. त्यातील १५८.२१ चौरस मीटर खारफुटीचा भाग आहे.

दीड तासांचा प्रवास आता १५ मिनिटांत होणार (Travel Time Cut To 15 Minutes)

या मार्गामुळे सर्वसामान्यांना फायदा होणार आहे. त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. ऐरोली ते काटई नाका हा प्रवास दीड तासांवरुन १५ मिनिटांत होणार आहे. यामुळे बदलापूर आणि मुरबाड या दिशेने जाणाऱ्यांनाही फायदा होणार आहे. ठाणे-बेलापूर, महापेड, शीळ फाट्यावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT