Navi Mumbai Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Metro: वाशीमधून मेट्रो धावणार! मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट झटक्यात गाठता येणार

Navi Mumbai Metro 8 Vashi To Seawoods: नवी मुंबईकरांना लवकर मेट्रो मिळणार आहे. नवी मुंबई मेट्रोचा प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्यात आला आहे. आता लवकरच मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रोने जोडले जाणार आहे.

Siddhi Hande

मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार मेट्रो

वाशी, नेरुळ,सीवूड्सवरुन धावणार

मेट्रो ८ मार्गिकेतील २० स्थानकांची यादी

नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रोचं काम लवकरच सुरु होणार आहे. नवी मुंबई आणि मुंबईला जोडणाऱ्या या मेट्रो ८ मार्गिकेचं काम लवकरच सुरु होणार आहे. सिडकोने राज्य शासनाला या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आले आहे. हे मेट्रो नेरूळ आणि सीवूड्स रेल्वे स्थानकांना जोडली जाणार आहे.

ऑक्टोबरमध्ये मंजुरी मिळणार

मेट्रो ८ मार्गिकेचे काम एमएमआरडीए (MMRDA)आणि सिडको (CIDCO) संयुक्तपणे करणार होते. मात्र, आता या मार्गिकेची उभारणी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर केली जाणार आहे. आता निविदा राबवण्याची जबाबदारी सिडकोवर सोपवण्यात आली आहे. यामुळे या मार्गिकेचा आराखडा सिडकोने तयार केला आहे. हा आराखडा आता मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. आता ऑक्टोबरमध्ये याला मंजुरी मिळू शकते.

मेट्रो ८ चा मार्ग मुंबई विमानतळ ते नवी मुंबई एअरपोर्टला जोडला जाणार आहे. या मार्गात एकूण २० स्थानके असणार आहेत.हे मेट्रो लोकमान्य टर्मिनस येथे रेल्वे मार्गाशी जोडली जाणार आहे.यामुळे एअरपोर्ट, रेल्वे आणि मेट्रो असे तिन्ही मार्ग जोडले जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण २० हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामधील चार स्टेशन हे भूमिगत असणार आहेत. या मेट्रोचं काम लवकरच सुरु होणार आहे.

मेट्रो ८ मार्गिकेतील स्थानके (Metro 8 Stations Name)

  • मुंबई विमानतळ टर्मिनल २

  • फिनिक्स मॉल

  • एसजी बर्वे मार्ग

  • कुर्ला

  • लोकमान्य टिळक टर्मिनस

  • गरोडिया नगर

  • बैगनवाडी

  • मानखुर्द

  • आएसबीटी

  • वाशी

  • सानपाडा

  • जुईनगर

  • एलपी

  • नेरुळ स्थानक

  • सीवूड्स स्टेशन

  • अपोलो

  • सागर संगम

  • तारघर

  • नवीन मुंबई एअरपोर्ट वेस्ट

  • नवी मुंबई विमानतळ टी २

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

SCROLL FOR NEXT