CCTV  
मुंबई/पुणे

नवी मुंबईत मॅनेजरवर हल्ला, छातीवर तलवारीने सपासप वार, CCTV मध्ये धक्कादायक घटना कैद

navi Mumbai Crime News : नवी मुंबईमध्ये एका हॉटेल मॅनेजरवर तालवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामोठे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Namdeo Kumbhar

विकास मिरगणे, साम टीव्ही प्रतिनिधी

Kamothe Hotel Attack : जेवणाच्या बिलावरून हॉटेल मॅनेजर आणि ग्राहकामध्ये जोरदार वाद झाला. हाच वाद डोक्यात ठेऊन दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने हॉटेलमध्ये घुसून मॅनेजरवर तलवारीने सपासप वार केले. तलवारीने मॅनेजरच्या छातीवर आणि अंगावर वार केले. त्यानंतर कॅश काऊंटरवरही आदळाआपट केली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे. या हल्ल्यात हॉटेल मॅनेजर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी मुंबईतील कामोठे येथील हॉटेलमध्ये घुसून त्या तरुणाने तलवारीने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. कामोठे सेक्टर-६ मधील मानसरोवर हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री सुमारे सव्वा आठच्या सुमारास थरारक घटना घडली. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ होतीच, त्याशिवाय हॉटेलमध्येही ग्राहकांची गर्दी जास्त होती. सर्वजण टेबलवर जेवणाचा आनंद घेत होते. हॉटेलचे कर्मचारी ऑर्डर घेत होते. पण त्याचवेळी तरूण घुसला अन् राडा घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण तलवार घेऊन हॉटेलमध्ये घुसला होता. त्याने हॉटेल मॅनेजर उमेश शेट्टी यांच्या छातीवर वार केला. त्यानंतर त्याने काउंटरवरही ताबडतोब हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. उपस्थित ग्राहकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव करत पळ काढला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ कामोठ्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक दिवस आधी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे कामोठे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरूणाने हल्ला बिलामुळेच केला का? या हल्ल्यामागे दुसरे काही कारण होतं? याचा तपास कामोठे पोलिसांकडून करण्यात येत आहे. सायंकाळची वेळ असल्यामुळे हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी ही थरारक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Accident: भरधाव टिप्परनं दोघांना चिरडलं; होमगार्डची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

बोल्डनेसचा तडका! 'या' भोजपुरी अभिनेत्रीच्या कातिल सौंदर्यावर नेटकरी झाले फिदा; पाहा व्हायरल फोटो

Ananya Pandey:'साई पल्लवीशी तुझी तुलना होऊच शकत नाही'; भरतनाट्यममुळे अनन्या पांडे ट्रोल, मिम्सचा पाऊस

Crime News : प्रसिद्ध मराठी गायकाकडून खंडणी वसूल, लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणाची दिली धमकी

Maharashtra News Live Update: पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT