Navi Mumbai International Airport set to launch its first commercial flights from December 25. saamtv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: ख्रिसमसपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा; जाणून घ्या उड्डाणांचे वेळापत्रक अन् संपूर्ण ऑपरेशन

New Mumbai Airport December 25: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २५ डिसेंबरपासून उड्डाणे सुरू करणार आहे. इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर मुंबईला १६ प्रमुख देशांतर्गत ठिकाणांशी जोडणार आहेत. जाणून घ्या विमानतळाचं संपूर्ण वेळापत्रक आणि सुरुवातीच्या उड्डाण मार्गांची माहिती.

Bharat Jadhav

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे २५ डिसेंबरपासून

  • इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर सुरुवातीच्या टप्प्यात सेवा देणार

  • NMIA मुंबईला १६ देशांतर्गत शहरांशी जोडण्यात येणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशी विमानसेवा लवकरच सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर महिन्यात या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण करण्यात आले. आता या विमानतळावर लवकरच विमानसेवा सुरू केली जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (एनएमआयए) व्यावसायिक कामकाज २५ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितलंय.

सुरुवातीला इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर द्वारे विमानसेवा चालवली जाणार आहे. या एअरलाइन्सची विमानसेवा मुंबईला १६ प्रमुख देशांतर्गत स्थळांशी जोडणार आहे. ख्रिसमस म्हणजेच २५ डिसेंबरपासून नागपूर आणि नवी मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जोडल्या गेलेल्या पहिल्या दहा शहरांमध्ये नागपूरचा समावेश असणार आहे.

पहिल्या महिन्यात विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील. याळात साधारण २३ उड्डाण होतील. या कालावधीत प्रति तासाला १० विमाने उड्डाण भरतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवी मुंबई येथे येणारी पहिली फ्लाइट इंडिगो 6E460 असेन. हे विमान बेंगळुरूहून सकाळी ८ वाजता येईल. इंडिगो 6E882 सकाळी ८.४० मिनिटांनी ते हैदराबादला रवाना होईल.

ही नवीन विमानतळावरून पहिली आउटबाउंड सेवा असेन. दरम्यान विमानतळवरील अधिकाऱ्यानं सांगितलं की, अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, पुढील वर्षी २५ डिसेंबर ते ३१ जानेवारी दरम्यान विमानतळावरून दररोज २३ उड्डाणे होतील. त्यानंतर यात वाढ करत ३४ उड्डाणे येथून केली जाणार आहेत.

अशी असेल नवी मुंबई ते नागपूर विमानसेवा

इंडिगोच्या वेळापत्रकानुसार नवी मुंबई-नागपूरचं विमान मुंबईहून दुपारी १:४५ वाजता निघेल आणि दुपारी ३:२० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीचे विमान नागपूरहून दुपारी ४:०० वाजता निघेल आणि नवी मुंबईला ५:३५ वाजता पोहोचेल. नागपूर ते मुंबंईस विमानाचं तिकीट तुम्हाला हवं असेन तर तुम्हाला इंडिगो एअरलाइन्सच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

जर तुम्हाला थर्टी फस्टसाठी मुंबईला जायचं असेल तर तु्म्हाला तिकीट बुक करावे लागले. दरम्यान पुढे भविष्यात नवी मुंबई ते नागपूरसाठी विमानांची संख्या वाढवली जाईल, अशी माहिती इंडिगो एअरलाइन्सकडून देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : क्षणात सर्व काही संपलं! सौदी अरेबियातील भीषण अपघात एकाच कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू

Income Tax Refund: करदात्यांसाठी बातमी, कर परतावा कधी मिळणार, आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics: चंद्रपुरात भाजपसोबत मोठा गेम,४ नगरपरिषदांमध्ये पक्षात्तर करत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधातच बंडखोरी

Supreme Court :...तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

Maharashtra Live News Update: मुंबईत लोकलमध्ये गर्दुल्याचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT