Seawoods–Darave station renamed to Seawoods–Darave–Karave; Railways updates station code to SWDK. saam tv
मुंबई/पुणे

Seawood Darave : रेल्वेचा मोठा निर्णय, आणखी एका स्टेशनचं नामांतर, नाव बदलण्यामागचा इतिहास सांगितला!

Seawoods Darave Railway Station Rename: रेल्वे मंत्रालयाने नवी मुंबईतील सीवूड्स-दारावे स्टेशनचे अधिकृतपणे नाव बदलले आहे. या स्टेशनचा स्टेशन कोड देखील बदलण्यात आलाय. नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला? हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • स्थानकाचे नाव सीवूड्स-दारावे वरून 'सीवुड्स-दारावे-करावे' करण्यात आले आहे.

  • सर्व रेल्वे नोंदी, दिशादर्शक फलक, घोषणा प्रणाली तसेच प्रवासी माहिती प्रणालींमध्ये बदल करण्यात आलाय.

  • प्रवाशांनी स्टेशनच्या नाव बदलाची नोंद घ्यावी

हार्बर मार्गावरून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने नवी मुंबईतील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलले आहे. नवी मुंबईला मुंबई महानगर प्रदेशाशी जोडणाऱ्या हार्बर मार्गावरील सीवूड्स-दारावे स्थानकाचे आता अधिकृतपणे नाव बदलण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून सीवूड्स-दारावे स्टेशनचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हार्बर रेल्वे लाईन नवी मुंबई परिसराला मुंबई महानगर प्रदेशाशी जोडते.

महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून रेल्वे मंत्रालयाने स्थानकाचे नाव बदलून सीवूड्स-दारावे-करावे असे करण्यात आले आहे. तर नव्या स्थानकाचा कोड SWDK असा असणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव बदलण्याची माहिती देताना सांगितले की, स्थानिक भाग लक्षात घेऊन हे नामकरण करण्यात आलंय. "सीवूड्स" हे नाव जवळच्या गृहनिर्माण संस्थेला सूचित करते, तर "दारावे" आणि "करावे" ही जवळच्या दोन गावांची नावे आहेत. यामुळे स्टेशनच्या नावात तिन्ही प्रमुख ठिकाणे समाविष्ट करण्यात आली आहेत.

या स्टेशनचा कोडदेखील बदलण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने याची पुष्टी केली. नाव बदलण्याआधी स्टेशनचा कोड SWDV होता. तर प्रवक्त्याच्या मते, हा कोड आता SWDK मध्ये बदलण्यात आलाय. नवी मुंबईतील स्टेशनच्या नाव बदलण्याचा प्रशासकीय निर्णय तात्काळ लागू करण्यात आलाय. त्यामुळे नवीन नाव आणि कोड स्टेशन साइनबोर्ड आणि रेल्वे सूचीमध्ये समाविष्ट केलं जाणार आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी विशेष सेवा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी ५/६.१२.२०२५ (शुक्रवार – शनिवार)च्या मध्यरात्री परळ– कल्याण आणि कुर्ला – वाशी/पनवेल दरम्यान १२ अतिरिक्त उपनगरी विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरी विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबा देतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chicken Kabab Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखे ज्यूसी -क्रिस्पी चिकन कबाब

चुकीच्या UPI ID वर पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन नका घेऊ; या स्टेप्स फॉलो करा, मिनिटात पैसे येतील परत

Maharashtra Live News Update: भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला उमेदवारी

Mustard Oil For Skin: त्वचेला लावा मोहरीचे तेल, फक्त १० दिवसांत दिसेल मोठा फरक

Raigad Tourism : साहसप्रेमींसाठी आव्हानात्मक ट्रेकचा अनुभव, रायगडजवळील 'हा' किल्ला एकदा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT