Navi Mumbai Crime Saamtv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime: आईच्या हत्येचा तपास सुरू होता, मुलीच्याही खुनाचा झाला उलगडा; एका फोनमुळं मारेकरी जावई गजाआड

Mother Daughter Death Mystrey: आईच्या मृत्यूचा तपास सुरू असताना ११ महिन्यापूर्वी लेकीच्याही खुनाचा उलघडा झाल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतून समोर आला आहे.

Gangappa Pujari

Navi Mumbai Crime News: आईच्या मृत्यूचा तपास सुरू असताना ११ महिन्यापूर्वी लेकीच्याही खुनाचा उलघडा झाल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतून समोर आला आहे. या दोन्ही हत्या एकाच व्यक्त केल्या असून नराधम आरोपी जावई आणि त्याच्या तिघा साथिदारांना उरण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मयुरेश अजित गंभीर असे या आरोपीचे नाव आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण; चला जाणून घेवू... (Crime News In Marathi)

अज्ञात महिलेचा आढळला होता मृतदेह..

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, दहा जुलै रोजी उरण तालुक्यातील (Uran) पिरकोन-सारडे गावच्या हद्दीत रस्त्यावर ५४ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृतदेहाच्या मानेला मागून बाजूने भोसकल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे या महिलेची हत्या झाल्याचे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या घटनेच्या तपासात पोलिसांनी सुत्रे हलवत संबंधित महिलेची माहिती मिळवली.

धक्कादायक माहिती समोर...

यावेळी या महिलेचे नाव भारती आंबोरकर (Bharati Amborkar) असून ती डोंबिवली परिसरातील असल्याचे समोर आले. त्यानंतर अधिक तपासात महिलेचा जावई मयुरेश अजित गंभीर (Mayuresh Gambhir) याचा फोन आल्यानंतर ती घराबाहेर पडल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी मयुरेश अजित गंभीर याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

मयुरेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो तडीपार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शोध घेत आरोपी मयुरेश याला मानपाडा खोणी डोंबिवली येथून अटक केले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या हत्येची कबुली दिली. तसेच आरोपीने मृत महिलेच्या मुलीची ११ महिन्यांपूर्वी हत्या केल्याचे सांगितले.

आधी पत्नीची हत्या..

मृत महिलेची मुलगी प्रीतीचा (Preeti Gambhir) विवाह आरोपी मयुरेश अजित गंभीर याच्याशी झाला होता. मयुरेश गंभीर हा सराईत गुन्हेगार होता. २०१४ मध्ये अलिबाग येथील एका स्थानिकाच्या हत्येप्रकरणी त्याला अटक झाली होती. मात्र पुराव्याअभावी त्याची सुटका झाली. २०१४ मध्ये कारावासात जाण्यापूर्वी दिलेले नऊ लाख रुपये परत देण्यास नकार दिल्याने त्याने आपल्या पत्नीचा ऑगस्ट २०२२ मध्ये खून केला.

प्रीतीच्या हत्येनंतर कित्येक दिवस होऊनही मृत भारती आंबोकर यांचा त्यांची मुलगी प्रीती हिच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे मुलीशी बोलणे करून दे, असा तगादा प्रीतीची आईने जावई मयुरेशकडे लावत होत्या. या तगाद्याला कंटाळून त्याने सासूचाही काटा काढण्याचा निर्णय घेतला.

सासूलाही संपवले..

त्याने तीन साथीदारांसह सासू भारती आंबोकर (55) हिला मुलगी प्रीती हिची भेट करून देण्याच्या निमित्ताने कट करून इनोवा गाडीत बसवले. पनवेल परिसरातील साई खिंडीत पिस्तोलने दोन गोळ्या झाडून जखमी केले. त्यानंतर उरण येथील सारडे पिरकोन रस्त्यावर आल्यावर तिच्या गळ्यावर चाकू मारून पलायन केल्याची कबुली संबंधित महिलेच्या जावयाने दिली.

मायलेकीच्या या धक्कादायक हत्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून माजी सैनिक असलेला मयुरेश हा गेल्या वर्षी खुनाच्या गुन्ह्यातुन निर्दोष सुटला होता. त्याला पुन्हा पत्नी व सासूच्या खुनप्रकरणी अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT