Delhi Viral Video: क्षुल्लक कारणावरुन वाद अन् कारचालकाने केलं भयंकर कृत्य; तरुणाला बोनेटवर टाकून १ KM... धक्कादायक व्हिडिओ

Delhi Shoking Video: व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनीही या व्यक्तीवर कारवाई केली आणि त्याला अटक केली आहे
Delhi Viral Video
Delhi Viral VideoSaamtv
Published On

Delhi Viral VIdeo: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक अपघातांच्या घटना समोर येत आहेत. सोशल मीडियावरही भयंकर अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा उभा राहतो.

सध्या राजधानी दिल्लीमधून अशीच अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये एका कारचालकाने तरुणाला बोनेटवर बसवून फरफटत नेल्याचे दिसत आहे. (Viral Video News In Marathi)

Delhi Viral Video
Raigad Irshalwadi Landslide Update: इर्शाळवाडीत ढिगाऱ्याखालून महिलेला ३६ तासांनी जिवंत बाहेर काढलं

समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडिओ (Viral Video) दिल्लीच्या (Delhi) नोयडामधील असल्याचे सांगण्यात येत आहे.  नोएडाच्या गढी चौखंडी भागात बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास दोन कारमध्ये टक्कर झाली. या अपघातानंतर या दोन कार चालकांचा मोठा वाद झाला.

हा वाद इतका वाढत केला की रागाच्या भरात एका कार चालकाने दुसऱ्याला बोनेटवर बसवून एक किलोमीटररपर्यंत फरफटत नेले. बोनेटवरील तरुण ओरडत असतानाही कार चालकाने तशीच कार पळवली. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

Delhi Viral Video
Belagavi Border Dispute: बेळगाव सीमाप्रश्न सुटणार? ग्रामविकास विभागाने मागवली सीमालगतच्या गावांची माहिती

हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या कारचालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर काही जणांनी अशा लोकांचे लायसेन्स रद्द करण्याचीही मागणी केली आहे. दरम्यान, या व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनीही या व्यक्तीवर कारवाई केली आणि त्याला अटक केली आहे. तसेच त्याची कारही जप्त करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com