Raigad Irshalwadi Landslide Update: इर्शाळवाडीत ढिगाऱ्याखालून महिलेला ३६ तासांनी जिवंत बाहेर काढलं

NDRF Rescue Women Alive After 36 Hours: तब्बल ३६ तासांनंतर एका महिलेला जीवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
NDRF Rescue Women Alive After 36 Hours
NDRF Rescue Women Alive After 36 HoursSaam Tv
Published On

Irshalwadi News: रायगड (Raigad) जिल्ह्यातल्या खालापूरजवळी इर्शाळवाडीवर बुधवारी दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत १०० पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या सर्वांना वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. घटनास्थळावर स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ (NDRF) आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून (Fire Brigade) बचावकार्य सुरु आहे.

अशामध्ये तब्बल ३६ तासांनंतर एका महिलेला जीवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

NDRF Rescue Women Alive After 36 Hours
Mumbai Rain Today : मुंबईत मुसळधार; रेल्वे वाहतूक उशिराने, रस्ते तुंबले

खालापूरनजीकच्या इर्शाळगाडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत या गावामध्ये असलेली ४० ते ५० घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली. या गावामध्ये २५० पेक्षा जास्त लोकं राहत होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळावर बचाव पथक दाखल झाले. आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून १०३ जणांना वाचवण्यात आला आहे. तर अद्याप १०० पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

NDRF Rescue Women Alive After 36 Hours
Irshalgad Landslide: माझ्या मुलीला शोधायला आलोय; ८५ वर्षीय बापाचं हृदय लेकीसाठी तुटतंय, इर्शाळवाडीत दुसऱ्या दिवशीही चालत पोहोचले

इर्शाळवाडीचा परिसरात डोंगराळ असून त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही, त्यात मुसळधार पाऊस, धुके यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. तरी देखील बचाव पथकाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर सरकारकडून उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com