Navi Mumbai Latest News
Navi Mumbai Latest News सिद्धेश म्हात्रे
मुंबई/पुणे

Video: नवी मुंबईत जुन्या वादातून एकाला जबर मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबई: जुन्या वादातून एका व्यक्तीला चार जणांनी कार्यालयात घुसून जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) कोपरखैरणे भागात जुन्या वादातून चार जणांनी एका व्यक्तीला कार्यालयात घुसून जबर मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये (CCTV) कैद झाला आहे. या प्रकरणी आज, गुरुवारी पहाटे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Navi Mumbai Crime News)

पाहा व्हिडिओ -

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार मारहाणीत असलेले कैस जाफर पटेल, सुफीयान दिवाण फक्की, निफाज पटेल आणि ताहीर पटेल अशी या चार आरोपींची नावे आहेत. तर कासीम सलमानी असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी कोपरखैरणे गावातील आपल्या रियल इस्टेट कार्यालयात बसले असताना कैस जाफर पटेल आणि सुफीयान फक्की यांनी कार्यालयात घुसून कासीम यांना फरशी पुसण्याच्या काठीने आणि लोखंडी सळईने जोरदार मारहाण केली.(Latest Marathi News)

या घटनेनंतर कासीम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचा एक हात फ्रँक्चर झाला आहे. फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहणारे असून जुन्या वादातून ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कोपरखैरणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

Baby Girl Names : चिमुकल्या मुलींसाठी सुंदर नावांची यादी; सर्व नावांचे अर्थही जाणून घ्या

Today's Marathi News Live : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालाबाबत आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT