Gold Smuggling Video: चॉकलेटमधून सोन्याची तस्करी; आरोपीचा जुगाड पाहून सीमाशुल्क विभागाचे अधिकारीही चक्रावले

Customs dept seize gold worth around Rs 19 lakh from chocolates & toffees at Mumbai Airport : या सोन्याची किंमत तब्बल १८ लाख ८९ हजार १४ रुपये इतकी आहे.
Gold Smuggling On Mumbai Airport
Gold Smuggling On Mumbai AirportMumbai Customs Zone 1

मुंबई: दुबईतून भारतात अवैधपणे सोने आणणाऱ्या एका आरोपीला मुंबई (Mumbai) विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. सोन्याची तस्करी (Smuggling ) करणाऱ्या या आरोपीने चक्क चॉकलेटमध्ये हे सोने लपवून आणले होते. त्याने सोन्याला चॉकलेटच्या कागदासारखा वापर करत (Chocolate Wrap Paper) ते दुबईतून भारतात आणले. मात्र, सीमाशुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपींचे बिंग फुटले आहे. या सोन्याची किंमत तब्बल १८ लाख ८९ हजार १४ रुपये (18,89,014) इतकी आहे. सोने तस्करीसाठी ही लढवलेली शक्कल पाहून अधिकारीही चक्रावले आहेत. (Mumbai Crime News)

पाहा व्हिडिओ -

जप्त केलेल्या सोन्याची किंमत 18,89,014 रुपये असल्याचे सीमाशुल्क विभागाने सांगितले. सोन्याचे तुकडे करून ते दोन थरांच्या चॉकलेट आणि टॉफीच्या रॅपरमध्ये गुंडाळले गेले होते, जे शर्टच्या मधोमध कार्डबोर्डमध्ये लपवले होते जेणेकरून कोणालाही ते सापडू नये. मात्र, दक्ष सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपींचं बिंग फुटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com