Vashi News  Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime News : वाशीतील प्रसिद्ध मॉलमधील स्पामध्ये सुरु होतं भलतंच काम; पोलिसांनी धाड टाकली अन्...

Navi Mumbai Crime News : नवी मुंबई मानवी तस्करी विरोधी सेलच्या पोलिसांनी याबाबत सांगितलं की, या कारवाईत आरोपी महिलेला अटक करण्यात आलं आहे.

प्रविण वाकचौरे

Navi Mumbai :

वाशी येथील एका प्रसिद्ध मॉलमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांना पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका ४० वर्षीय महिलेला अटक केली आहे. वाशीतील मॉलमध्ये असलेल्या स्पामध्ये हा वेश्याव्यवसाय सुरू होता.

पोलिसांना याबाबत एक गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी या मॉलमध्ये सापळा रचून कारवाई केली. सर्वात आधी स्पामध्ये नेमकं काय सुरु आहे, हे समजून घेण्यासाठी पोलिसांनी एकाला ग्राहक म्हणून या स्पामध्ये पाठवले. त्यावेळी येथे दोन तरुणी आढळल्या ज्यांना देहव्यापार करण्यासाठी भाग पाडलं जात होतं. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Latest News)

पोलिसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहाकाने आता जाऊन रेकी केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी या स्पावर धाड टाकली. नवी मुंबई मानवी तस्करी विरोधी सेलच्या पोलिसांनी याबाबत सांगितलं की, या कारवाईत आरोपी महिलेला अटक करण्यात आलं आहे. तर दोन तरुणींची सुटका करुन त्यांना रेस्क्यू होममध्ये पाठवण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत मानवी तस्करी केल्याप्रकरणी कलम 370 आणि 506 कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्सोवा गावातील दुकानाला मोठी आग

MS Dhoni : IPL 2026 मध्ये धोनी खेळणार की नाही? CSK च्या सीईओंनी दिली मोठी अपडेट

१८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप झाला 'तो' व्यवहारच रद्द; अजित पवारांनी दिली माहिती

Manoj Jarange: जरांगे हत्या कट प्रकरणात नवा ट्विस्ट; अटक आरोपीची पत्नी आणि आईचा गंभीर आरोप|VIDEO

PM Kisan Yojana: खुशखबर! पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट; या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार ₹२०००

SCROLL FOR NEXT