पिंपरी चिंचवड : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल ५ लाख ४० हजारांचे मेफेड्रोन ड्रग्स जप्त केले आहे. (Pimpri Chinchwad) पिपरी- चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हि कारवाई केली आहे. (Maharashtra News)
पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करी विरोधात कारवाई केली आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) ठाण्याच्या हद्दीतील जुना पुणे- मुंबई महामार्गावर अज्ञात व्यक्ती मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत शहजाद आलाम अब्बास कुरेशी (वय ३८) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
१६ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
शहजाद आलम अब्बास कुरेशी याने मेफेड्रॉन ड्रग्स मुंबईतील रिझवान चाँदीवालाकडून आणल्याचं प्राथमिक (Police) तपासात समोर आलं आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाकडून १० लाखांची महागडी चारचाकी गाडी असा एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.