Pimpri Chinchwad Fire : मोरवाडी कोर्टाजवळील मोकळ्या जागेत भीषण आग

Pimpri Chinchwad News : वेगवेगळ्या इंडस्ट्रियल कंपन्या आणि नागरिकांची घर आहेत. त्यामुळे इंडस्ट्रियल कंपन्या आपला कचरा मोरवाडी कोर्टाजवळील मोकळ्या जागेत फेकून देतात
Pimpri Chinchwad Fire
Pimpri Chinchwad FireSaam tv

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी कोर्टाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत भीषण आग लागली आहे. मागच्या एक- दीड तासापासून ही आग धगधगत आहे. (Pimpri Chinchwad) शहरातील परिसरात लागलेल्या या आगीमुळे आणि आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्य धोक्यात आल आहे. (Latest Marathi News)

Pimpri Chinchwad Fire
Nandurbar News : मुदतबाह्य औषधी फेकली उघड्यावर; नंदुरबार तालुक्यातील भालेल परिसरातील प्रकार

पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी कोर्टाजवळच्या मोकड्या जागेत ज्या ठिकाणी आग (Fire) लागली; त्या ठिकाणापासून काही अंतरावर वेगवेगळ्या इंडस्ट्रियल कंपन्या आणि नागरिकांची घर आहेत. त्यामुळे इंडस्ट्रियल कंपन्या आपला कचरा मोरवाडी कोर्टाजवळील मोकळ्या जागेत फेकून देतात. त्याच इंडस्ट्रियल गारबेजने पेठ घेतला असावा असा (Fire Brigade) अग्निशमन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pimpri Chinchwad Fire
Thane News : पिकनिक दरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग; एकास अटक, तीन शिक्षकांनाही केले निलंबित

८ अग्निशमन बंब दाखल 

मोकड्या जागेतील कचऱ्याला आग लागली असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे सात- आठ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभाग शर्तीचे प्रयत्न करत आहे. दरम्यान आगीमुळे धुराचे लॉट परिसरात पसरले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com