Pimpri Chinchwad Crime News : हिंजवडीमध्ये दाेघांना अटक, १ लाख १० हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त

बनावट नोटा बाळगणाऱ्या संशयितांनी त्यांच्या घरातच बनावट नोटा छापल्या असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली आहे.
Pimpri Chinchwad Crime News :
Pimpri Chinchwad Crime News :saam tv
Published On

Pimpri Chinchwad News :

हिंजवडी परिसरात बनावट चलनी नोटा घेऊन जाणाऱ्या दोन युवकांना हिंजवडी पोलिसांनी बेडया ठाेकल्या. त्यांच्या ताब्यातून पाेलिसांनी जवळपास १ लाख १० हजार रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बनावट नोटा बाळगणाऱ्या संशयितांनी त्यांच्या घरातच बनावट नोटा छापल्या असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली आहे. या प्रकरणात अभिषेक राजेंद्र काकडे आणि ओमकार रामकृष्ण टेकाम यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. (Maharashtra News)

Pimpri Chinchwad Crime News :
Gram Sevak Andolan : ग्रामसेवकांचे बुधवारपासून असहकार आंदाेलन

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अभिषेक राजेंद्र काकडे, ओमकार रामकृष्ण टेकम आणि एक अल्पवयीन मुलाच्या विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये (भादवी 489 क आणि 34 कलमानुसार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Pimpri Chinchwad Crime News :
Parbhani : परभणीत आजपासून बससेवा सुरळीत, दाेन दिवसांत एसटी महामंडळाचे 65 लाखांचे नुकसान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com