Farmer Success Story : शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड; ३ महिन्यातच साडेचार लाखाचे उत्पादन

Malegaon News : अडिच महिन्यापुर्वी शिमला मिरची लागवड केली असून, यातून उत्पादन सुरु झाले आहे. ५५ दिवसात पहिला तोडा जवळपास ४० टन निघाला.
Farmer Success Story
Farmer Success StorySaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : पारंपरिक शेती करणे आता कठीण झाले आहे. एकीकडे पावसाचा लहरीपणात शेतातून (Nashik) उत्पादन मिळत नाही. तर दुसरीकडे शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरीसमोर आर्थिक विवंचना असते. मात्र मालेगाव येथील (Farmer) शेतकऱ्याने शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड केली असून मागील ३ महिन्यातच तब्बल साडेचार लाखाचे उत्पन्न घेतले आहे. (Tajya Batmya)

Farmer Success Story
Thane News : पिकनिक दरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग; एकास अटक, तीन शिक्षकांनाही केले निलंबित

सध्या दुष्काळी परिस्थिती असली तरी त्यावर मात करण्याचा प्रयत्न काही शेतकरी करत आहेत. अशाच प्रकारे नाशिकच्या मालेगाव (Malegaon) तालूक्यातील मोरदर येथील शेतकरी निंबाजी ठाकरे यांनी आपल्या दहा एकर क्षेत्रात विविध पिक घेतली आहेत. यामध्येच त्यांनी काही भागात शेडनेटच्या माध्यमातून अडिच महिन्यापुर्वी शिमला मिरची लागवड केली असून, यातून उत्पादन सुरु झाले आहे. ५५ दिवसात पहिला तोडा जवळपास ४० टन निघाला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Farmer Success Story
Pimpri Chinchwad Fire : मोरवाडी कोर्टाजवळील मोकळ्या जागेत भीषण आग

आणखी ४० टन उत्पादन अपेक्षित 

आतापर्यंत त्यांनी तीन महिन्यात साडेचार लाखाचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. तर आणखी ४० टन उत्पादन निघणे अपेक्षित आहे. दुष्काळी परिस्थित फोगर ड्रिपला उपलब्ध पाणी देण्यात आल्याने पाण्याचे योग्य नियोजनामुळे उत्पादनात वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com