Navi Mumbai Breaking News: Saamtv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News: १४ वर्षांनी 'बापमाणूस' झाला, पण गरिबीने घात केला; रुग्णालयाने बिलाचा तगादा लावल्याने जुळ्या लेकरांच्या वडिलांची आत्महत्या

Navi Mumbai Breaking News: नेरुळमधील तेरणा हॉस्पिटलने बिलासाठी तगादा लावल्याने नरेंद्र गाडे नामक व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Gangappa Pujari

सिद्धेश म्हात्रे| नवी मुंबई, ता. २८ जुलै २०२४

जुळ्या मुलांच्या उपचाराचे पैसे देण्यासाठी रुग्णालयाने तगादा लावल्याने एका व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील तेरणा रुग्णालयाविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नेरुळमधील तेरणा हॉस्पिटलने बिलासाठी तगादा लावल्याने नरेंद्र गाडे नामक व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत नरेंद्र गाडे यांनी मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांच्या मृत्यला तेरणा हॉस्पीटल जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नरेंद्र गाडे हे नवी मुंबईमध्ये राहतात. लग्नाला अनेक वर्ष उलटूनही त्यांना मुलबाळ नव्हते. देवाच्या कृपेने तब्बल १४ वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलला होता. गाडे यांच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र दोन्ही बाळांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नेरुळमधील तेरणा रुग्णालयामध्ये या चिमुकल्यांवर उपचार सुरू होते. मात्र रुग्णालयाने गाडे यांच्याकडे बील भरण्यासाठी तगादा लावला होता. रुग्णालयाच्या याच त्रासाला कंटाळून गाडे यांनी राहत्या घरात गळफास घेत आपले आयुष्य संपवले. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, मृत नरेंद्र गाडे यांचे नातेवाईक व भिम आर्मी संघटनेने तेरणा हॉस्पीटलवर जोपर्यंत गुन्हा दाखल करुन ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत नरेंद्र गाडे यांच्यावर अंत्यसंस्कार न करण्याची भुमिका घेतली होती. त्यामुळे नेरुळ पोलिसांकडून तेरणा हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याट आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT