Navi Mumbai: स्पायडरमॅन बनून खारघरमध्ये चोरी करणाऱ्या गॅंगला अटक Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: स्पायडरमॅन बनून खारघर परिसरात चोरी करणाऱ्या गॅंगला अटक

रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

विकास मिरगणे

विकास मिरगणे

नवी मुंबई : खारघर Khargar येथील गेल्या पाच ते सहा महिन्यापासून वेगवेगळया सेक्टरमधील ज्या घरांच्या खिडक्यांना ग्रिल्स बसलेले नाहीत, अशा इमारतीमध्ये लोक घरात झोपलेले असताना, रात्रीच्या वेळी पाइप वरून तसेच वेगवेगळया पध्दतीने वर चढून स्लायडींग खिडकीतून आत जावून, चोऱ्या करून पसार होणाऱ्या स्पायडर मॅन गँगने Kharghar spider-man gang अनेक चोऱ्या केल्याने उघडीस आले होते. त्या गॅंगला रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबई झोन 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील Shivraj Patil म्हणाले की, आम्हाला रात्री काही घरांमध्ये चोरी झाल्याची तक्रार मिळाली होती, त्यानंतर आम्ही खारघर पोलीस स्टेशनमध्ये Kharghar Police Station एक टीम तयार करण्यात आली होती.

हे देखील पहा-

चोर पाईप्सच्या मदतीने इमारतीत चढत असत;

जेव्हा त्या टीमने सीसीटीव्ही फुटेजच्या CCTV Footage मदतीने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली, तेव्हा कळले की चोर पाईप्सच्या मदतीने इमारतीत चढायचे आणि नंतर खिडकी उघडून पळून जात असत. आरोपी रेकी करायचे आणि कोणत्या घरात खिडकीला ग्रील नाही हे शोधायचे, त्यानंतर ते रात्री त्याच घरात चोरी करत असत.

आरोपींची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आरोपींना मुंबईतील गोवंडी Govandi Mumbai येथून अटक केली. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले, जिथून त्याला रिमांडवर पाठवण्यात आले आहे. सदरचे आरोपीत हे मुंबई गोवंडी परिसरातील राहणारे आहेत 7 गुन्हे उघडकीस आणून आणले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 2 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

2 लाखांचा मुद्देमाल जप्त;

पोलिसांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेले मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने अंगठी, 3 लॅपटॉप, 10 मोबाईल फोन, 3 टॅब, 1 हार्डडिस्क, 1 गिटार इत्यादी असा तब्बल 2,71,000/- रूपये किमतीचा मुददेमाल जमा करण्यात आला आहे. गॅंगमधील 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT