Lakhimpur: प्रियांका आणि राहुल गांधींनी घेतली मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचले आहेत.
Lakhimpur: प्रियांका आणि राहुल गांधींनी घेतली मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट
Lakhimpur: प्रियांका आणि राहुल गांधींनी घेतली मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेटTwitter/ANI
Published On

लखीमपूर : लखीमपूर खेरी मध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या निर्घृण प्रकारानंतर देशभरातील वातावरण Lakhimpur Violence तापलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केलेल्या संघर्षानंतर अखेर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचले आहेत. लवप्रीत यांच्या कुटुंबातील farmers Family सदस्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या गळ्यात पडून भेट घेतली आहे.

मृत पावलेले शेतकरी लवप्रीत यांच्या घरी गांधी आणि प्रियंका गांधी एकत्र Rahul Gandhi and Priyanka Gandhi Together meets Farmer's Family पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल Bupesh Baghel आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी Charanjit Channi सोबत होते. यावेळी जवळपास अर्धा तास Half an Hour त्यांनी प्रियांका आणि राहुल गांधी मृत कुटुंबीयांसोबत होते. माहितीनुसार, त्यांनी लवप्रीत कुटुंबीयांचं सांत्वन केलं आणि या लढाईमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत. असे आश्वासनही राहुल गांधीं यांनी कुटुंबियांना दिलं.

Lakhimpur: प्रियांका आणि राहुल गांधींनी घेतली मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट
Lakhimpur Kheri violence: शेतकऱ्यांवर अन्याय होतोय- राहुल गांधी

दरम्यान, उत्तरप्रदेशमध्ये Uttar Pradesh जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद Press Conference घेतली होती. त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर UP Government जोरदार हल्ला चढवला होता.राहुल गांधी यांनाही परवानगी नाकारण्यात आली होती. या ठिकाणी शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. शेतकऱ्यांवर ठरून या ठिकाणी अन्याय होत आहे. केंद्राचे कायदे हे कायम शेतकरी विरोधात आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हत्या होताना दिसून येत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्यात येत आहेत. हल्ला करण्यात आलेल्या मंत्र्याच्या मुलं विरोधात अद्याप आजून देखील कारवाई झालेली नाही.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com